नांदेड : तलवारी, खंजरचा शस्त्रसाठा जप्त  

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

वजिराबाद पोलिसांनी गुरुद्वारा परसिरात असलेल्या एका दुकानावर बुधवारी  सायंकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दुकानचालकास अटक केली आहे. त्याच्याकडून नऊ तलवारी, १३ खंजर व एक गुप्ती असा घातक शस्त्र साठा जप्त केला. 

नांदेड : वजिराबाद पोलिसांनी गुरुद्वारा परसिरात असलेल्या एका दुकानावर बुधवारी  सायंकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दुकानचालकास अटक केली आहे. त्याच्याकडून नऊ तलवारी, १३ खंजर व एक गुप्ती असा घातक शस्त्र साठा जप्त केला. 

सध्या विधानसभा निवडणुक व येणाऱ्या काळात दुर्गा तसेच दिवाळी, दसरा यासह आदी महत्वाचे उत्सव आहेत. त्यानिमित्त शहरात व जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्था बाधीत होऊ नये म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांच्या सुचनेवरून वजिराबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिवले यांना आपल्या गुन्हे शाध पथकाला आपल्या हद्दीत गस्त घालण्यास सांगितले. पथकाचे प्रमुख फौजदार प्रविण राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गुरूद्वारा परिसरात गस्त घालण्यास सुरवात केली.

दरम्यान, त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुद्वारा गेट क्रमांक एकच्या समोर असलेल्या एका दुकानात तलवारी व खंजरचा साठा असून संबंधीत दुकानदार विनापरवानगी विक्री करित असल्याचे समजले. यावरून या पथकानी बुधवारी (ता. २५) सायंकाळी छापा टाकला. यावेळी दुकान चालकास ताब्यात घेऊन दुकानातील विनापरवानगी साठा करून ठेवलेल्या धारदार नऊ तलवारी, १३ खंजर व एक गुप्ती जप्त केली. संबंधीत दुकानचालकावर वजिराबाद पोलिस ठाण्यात प्रविण राठोड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्री. राठोड करित आहेत. या कारवाईबद्दल पोलिस अधिक्षक श्री. मगर आणि दत्ताराम राठोड यांनी वजिराबाद पोलिसांचे कौतूक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weapons are seized in vazirabad