विद्यार्थ्यांनी अनुभवली शस्त्रांची दुनिया 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलाची शस्त्रे कशी असतात, हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, या हेतूने शनिवारी (ता. ११) भारतीय लष्करातर्फे ‘नो युअर आर्मी मेला’अंतर्गत छावणीतील मैदानावर शस्त्रप्रदर्शन भरवण्यात आले होते. यात तब्बल २,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शस्त्रांची माहिती घेतली.

टीव्ही आणि सिनेमात दिसणारी शस्त्रे प्रत्यक्षात हाताळण्याची आणि पाहण्याची संधी यानिमित्त शहरातील विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराने उपलब्ध करून दिली. या संधीचा लाभ घेत २,००० विद्यार्थ्यांनी आणि नॅशनल कॅडेट कोरच्या मुलांनी लष्करी शस्त्रांची पाहणी केली. तसेच त्यांची माहिती जाणून घेतली आणि त्यांना हाताळलेही. ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. पायदळ आणि तोफखाना वापरत असलेली शस्त्रे सर्वांना माहितीसाठी एकत्र ठेवण्यात आली होती. स्थानिकांना या शस्त्रांची माहिती देणे आणि लष्करी सेवेप्रति त्यांच्यामध्ये जागृती करण्याच्या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात तोफा, बंदुका, रायफलींचा समावेश होता. 

Web Title: weapons experienced by students