उत्पादन वाढीसाठी हवामान केंद्र कटिबद्ध - डॉ. चटोपाध्याय

सुषेन जाधव
शुक्रवार, 6 जुलै 2018

आयएमडी आणि अटारी तर्फे महाराष्ट्र, गोवा, गुजरात या तीन राज्यातील २१ जिल्ह्यात जिल्हा स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार आहे.

औरंगाबाद - शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन वाढीसाठी हवामान केंद्र कटिबद्ध आहे. त्यासाठीे कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घ्यावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज, पीक सल्ला पोहोचवा असे मत भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) प्रमुख डॉ. एन. चटोपाध्याय यांनी शुक्रवारी (ता. ६) व्यक्त केले. आयएमडी आणि अटारी तर्फे महाराष्ट्र, गोवा, गुजरात या तीन राज्यातील २१ जिल्ह्यात जिल्हा स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील कृषी विज्ञान केंद्र येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी डॉ चटोपाध्याय यांनी योग्य वेळी, अचूक हवामान बदलाचा अंदाज मिळाल्याने सेलू (जि. परभणी) येथील शेतकऱ्याने पीक पद्धतीत बदल केला. परिणामी नुकसान न होता उत्पादन वाढ झाल्याची माहिती उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना दिली. असे हवामान केंद्र मराठवाड्यातील औरंगाबाद आणि तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे बसविण्यात येणार आहे. अचूक, योग्य, आणि वेळेत हवामान सल्ला देण्यासाठी प्रत्येक केव्हीके ने कायम तत्पर राहावे असेही डॉ. चटोपाध्याय म्हणाले. आयएमडीकडून हवामान अंदाज घेऊन शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवायचं, कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत आदी विषयावर हे प्रशिक्षण ७ जुलै पर्यंत असणार आहे. प्रशिक्षण देण्यासाठी अटारी पुणे चे संचालक डॉ. लखनसिंग, आयएमडी पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. के घोष, डॉ. बाला सुब्रमण्यम, परभणी कृषी विद्यापीठातील संचालक विस्तार शिक्षण डॉ. पी. जी. इंगोले आदी उपस्थित आहेत.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Weather Center is committed to increase production said Dr Chatopaddhyay