चित्रांतून दलाई लामा यांचे असे केले स्वागत : Video

अनिल जमधडे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

दलाई लामा हे शांतीचे दुत आहेत, त्यांच्याकडे लोक प्रतिबुद्ध म्हणून बघतात म्हणूनच दलाई लामा यांचे विचार चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला. या शिवाय अजिंठा, वेरुळ येथील चित्र आणि तथागतांचे चित्र या प्रदर्शनात साकारण्यात आले होते. या चित्र प्रदर्शनाने उपस्थित प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.

औरंगाबाद : जागतिक धम्म परिषदेच्या निमित्ताने बौद्ध धम्मगुरु दलाई लामा यांचे अथक परिक्षमातून साकारलेल्या चित्रातून दलाई लामा यांचे स्वागत करण्यात आले. विमानतळावर मुंबई, नाशिक आणि औरंगाबादच्या चित्रकारांनी चित्रप्रदर्शन साकारात लक्ष वेधून घेतले. 

नोबेल पुरस्कार विजेते दलाई लामा यांच्या स्वागतासाठी मुंबई, नाशिक आणि औरंगाबादच्या चित्रकारांनी चिकलठाणा विमानतळावर दलाई लामा यांच्या कार्याचा गौरव करणारे चित्र प्रदर्शन लावले होते. हे प्रदर्शन पाहून दलाई लामा भारावून गेले. मुंबईचे चित्रकार सुधीर काटकर, नितिन मिटकर, प्रेशीत मिटकर नाशिक येथील मेस डिझाईनच्या आर्टीटेक्‍ट हेमा मिटकर, अपुर्वा मिटकर औरंगाबाच्या पिंपरे आर्टच्या मयुरा पिंपरे, आणि चैतन्य कुंभकर्ण या चित्रकारांनी दलाई लामा यांचा संदेश चित्रातून देण्याचा प्रयत्न केला.

दलाई लामा हे शांतीचे दुत आहेत, त्यांच्याकडे लोक प्रतिबुद्ध म्हणून बघतात म्हणूनच दलाई लामा यांचे विचार चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला. या शिवाय अजिंठा, वेरुळ येथील चित्र आणि तथागतांचे चित्र या प्रदर्शनात साकारण्यात आले होते. या चित्र प्रदर्शनाने उपस्थित प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. 

Dalai Lama

तिबेटीयन थंका 

घरामध्ये ज्या प्रमाणे देवाची प्रतिमा लावली जाते, त्याप्रमाणे तिबेटीयन लोक घरामध्ये थंका चित्र लावतात. त्याचेच एक चित्र मुंबईचे चित्रकार सुधीर काटकर यांनी दलाई लामांचे चष्मा आणि डोळे दाखवून त्यांचे विचार चित्रातून व्यक्त केले आहेत. दलाई लामा यांचे शांतीचे विचार फडफडत्या पताक्‍याच्या माध्यमाने जगभर पसरले जात असल्याचा संदेश देणाऱ्या या चित्राने लक्ष वेधून घेतले. 

कोण म्हणाले - महापरीक्षा पोर्टल बंद करा

मेस इंडिया या नाशिच्या संस्थेच्या प्रमुख आर्टीटेक्‍ट हेमा मिटकर यांनीही दलाई लामा यांचा प्रवास दर्शवणाऱ्या चित्रांचा सामावेश केला. या विविध चित्रांमधून दलाई लामा यांचा जिवप्रवास उलगडण्याचा प्रयत्न या चित्रांच्या माध्यमाने करण्यात आला. 

पिंपरे आर्टसचे अजिंठा दर्शन 

औरंगाबादच्या पिंपरे आर्टसच्या आर्टीस्ट मयुरा पिंपरे यांनी जगप्रसिद्ध अजिठ्यांचे चित्र प्रदर्शनात साकारले होते. अजिठ्यांचा नष्ट झालेल्या चित्रांना पुन्हा साकारण्याचा प्रयतन करण्यता आला. दोन हजार वर्षापुर्वीचा अजिंठा पुन्हा चित्राच्या माध्यमातून साकारण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांनी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcome Of Dalai Lama by Aurangabad Artists