esakal | ओल्या दुष्काळात आगीची भर, ऊस, सोयाबीन खाक
sakal

बोलून बातमी शोधा

aag

परभणी जिल्ह्यातील ताडकळस जवळील फुलकळस येथे आगीत सोयाबीनच्या गंजीचे आग लागून नुकसान झाले तर वसमत तालुक्यातील गिरगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला. आधीच ओला दुष्काळ आणि त्यात आगीच्या घटनेने नुकसानीत भर पडली आहे. 

ओल्या दुष्काळात आगीची भर, ऊस, सोयाबीन खाक

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

परभणी ः सतत पडलेल्या पावसाने आधीच मेटाकूटीला आलेल्या शेतकऱ्याचे होणारे नुकसान पाठ सोडायला तयार नाही. अशाच दोन घटना परभणीसह हंगोली जिल्ह्यात घडल्या. ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील ताडकळस जवळील फुलकळस येथे आगीत सोयाबीनच्या गंजीचे आग लागून नुकसान झाले तर वसमत तालुक्यातील गिरगाव येथे शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला. त्यामुळे ओल्या दुष्काळात आगीची भर पडल्याचे पहावयास मिळते. 

शॉर्ट सर्किटने अडीच एकरांतील ऊस खाक 
गिरगाव (ता. वसमत) : शॉर्ट सर्किटमुळे अडीच एकर ऊस खाक झाल्याने शेतकऱ्याचे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. विठ्ठलराव कऱ्हाळे यांच्या शेतात मंगळवारी (ता.२७) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाणी टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. वसमत येथून अग्निशमन दलाची गाडी सुद्धा बोलावण्यात आली. मात्र, तोपर्यंत ऊस खाक झाला. पंचनामा करून तत्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्याने केली. 

सोयाबीन गंजीला आग, चौघांविरुद्ध गुन्हा 
ताडकळस ः फुलकळस (ता. पूर्णा) येथे गंजीला काहींनी लावलेल्या आगीत सोयाबीन खाक झाल्याची घटना २५ ऑक्टोबरला घडली. फुलकळस येथील शेतकरी नारायण प्रभाकर धूळशेटे यांनी शेतात सोयाबीनची गंजी लावली होती. काहींनी गंजीला लावलेल्या आगीत ७० क्विंटल सोयाबीनचे नुकसान झाल्याचे त्यांनी पोलिस ठाण्यात सांगितले. नारायण धूळशेटे यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस कर्मचारी वसीम काजी, बाळासाहेब रोडे तपास करीत आहेत.  

हेही वाचा -  नांदेडला मंगळवारी दिवसभरात ६६ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

अल्पवयीन पुतणीस चुलत चुलत्याने नेले पळवुन 
वालूर ः सेलू तालुक्यातील बोरगाव (जाहंगिर) गावातील १५ वर्षीय पुतणीला चुलत चुलत्याने आमिष दाखवून पळवुन नेल्याची घटना घडली. पळविणाऱ्या चुलत चुलत्यावर सोमवारी (ता.२६) रात्री गुन्हा दाखल झाला. सेलू तालुक्यातील बोरगाव (जाहंगिर) गावातील रहिवासी दिगंबर नारायण कांबळे (वय ३०) याने १५ वर्षीय अल्पवयीन चुलत पुतणीस आमिष दाखवून सोमवारी (ता.२६) दुचाकी क्रमांक (एम.एच. ०२ डी.एल.४६६१) वरून पळून नेले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर कांबळे यांच्याविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक विजय रामोड हे करत आहेत. 

हेही वाचा -  परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन

पाकीटमारी करणाऱ्या तिघांना मुद्देमालासह पकडले 
हिंगोली : पाकिटमारी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.२७) आरोपींना मुद्देमालासह पकडले. रवी वसेकर (रा.दिग्रस वाणी) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी कामानिमित्त सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बडोदा बँकेसमोर त्यांनी थांबल्यावर थोड्यावेळाने खिशातील पाकीट चेक केले असता पाकिट चोरल्याचे समजले. सदर पाकिटामध्ये चार हजार रुपये रोख रक्कम व इतर कागदपत्रे होती. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हा संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी एक पथक तत्काळ घटनास्थळी रवाना केले. पाकीटमारी करणारे तीन इसम रामलीला मैदानात जवळ असल्याबाबत खबर मिळाली असता पोलिस पथकाने छापा टाकून आरोपी संतोष शेळके (रा. डिग्रस कऱ्हाळे) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर इसमाने बडोदा बँकेचे समोरील इसमाच्या खिशातून पाकीट चोरल्याचे सांगून चोरी गेलेले पैसे व पाकीट काढून दिले आहे. तसेच सदर गुन्ह्यात सहभागी आरोपी सुरेश राठोड (रा.ईसापुर धरण), बंटी उर्फ बंट्या (रा.मस्तानशाहा नगर) हे फरार झाले आहेत. आरोपीस तपास कामी पोलिस स्टेशन हिंगोली शहर येथे हजर केले. 


संपादन ः राजन मंगरुळकर

loading image
go to top