
मृत्यूदंड झालेल्या कुण्या कैद्याला एकदम फासावर लटकवले जात नाहीत. कैद्याला ज्या दिवशी फाशी द्यायची त्या दिवसांच्या काही दिवसांपूर्वी कारागृह प्रशासन रोज पुतळ्याला घेऊन फाशीचा सराव करते.
औरंगाबाद - निर्भयाप्रकरणातील आरोपींना 22 जानेवारीला मृत्यूदंड दिला जाणार आहे. त्यासाठी तिहार कारागृह प्रशासानाने बस्कर कारागृह प्रशासनानाला फासासाठी लागणाऱया मनिला या दोराची आॅर्डरही दिली आहे. त्या अनुषंगाने मृत्यूदंड झालेल्या कैद्याला फासावर लटकवण्याचे काय नियम आहेत, त्यासाठी कोणती पूर्वतयारी केली जाते, याची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी...
अशी आहे प्रक्रिया
मृत्यूदंड झालेल्या कुण्या कैद्याला एकदम फासावर लटकवले जात नाहीत. कैद्याला ज्या दिवशी फाशी द्यायची त्या दिवसांच्या काही दिवसांपूर्वी कारागृह प्रशासन रोज पुतळ्याला घेऊन फाशीचा सराव करते. कैद्याच्या वजनापेक्षा अधिक पाच किलो वजनाचा हा पुतळा असतो. जर कैद्याचे वजन 60 किलो असेल तर 65 किलो वजनाचा पुतळा कारागृह प्रशासन तयार करते. अधिकाऱ्यांच्या समोर या पुतळ्याला दिवसातून तीन वेळा फासावर लटकवले जाते.
क्लिक करा आणि जाणून घ्या - कसा तयार होतो फाशीचा दोर
दोर तुटू नये, जल्लादाची मानसिकता तयार व्हावी, फाशीच्या ओट्यावरील लोखंडी अँगल, पत्रा, कळ हे सगळे व्यवस्थित आहे का, याची तपासणी या माध्यमातून केली जाते. गरज पडल्यास फाशीच्या ओट्यावरील लोखंडी अँगल आणि पत्राही बदलला जातो. कळ दाबताच तो बाजूला होतो की नाही, हेही सरावादरम्यान दिवसातून तीन वेळा पाहिले जाते.
तिहार कारागृहामध्ये अगोदरच आहेत पाच दोरखंड
तिहार कारागृहामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिहार कारागृहात अगोदरच फाशी देण्यासाठी आवश्यक असलेले पाच मनिला दोरखंड आहेत. त्यात आता 10 दोरखंडाची ऑर्डर तिहार कारागृह प्रशासानाने दिली आहे. निर्भया प्रकरणात चार जणांना फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. दरम्यान, तिहारमध्ये असलेल्या दोरखंडांचा वापर सरावासाठी केला जाऊ शकतो. जे दोर नव्याने येतील, त्याद्वारे आरोपींना फाशी दिली जाऊ शकतो. शिवाय फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र किंवा बंगालवरून फाशी देणारा बोलावण्यात येऊ शकतो.
कोण कैदी कुठे आहे बंद?
निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांपैकी एक पवन याला मंडोली करागृह क्रमांक -14 मधून तिहार कारगृह क्रमांक -2 मध्ये हलविण्यात आले आहे. यात अक्षय आणि मुकेशही बंद आहेत. विनय शर्मा हा तुरूंग क्रमांक चारमध्ये आहे.
एकाने केली आत्महत्या
सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयासोबत चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. दोषी ठरविण्यात आलेल्या सहा अल्पवयीन मुलांपैकी एकाला आता सोडून देण्यात आले. त्याचवेळी तिहारमध्येच एका आरोपी रामसिंगने आत्महत्या केली. उर्वरित चार दोषींना लवकरच फाशी देण्यात येईल.
हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...
अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे
जाणून घ्या - मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!