आकांक्षाच्या खुनाच्या दिवशी नेमके काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

औरंगाबाद - वसतिगृहानजीकच काम करीत असल्याने राहुल शर्माचे तेथून दिसणाऱ्या मुलींच्या खोलीकडे सारखे लक्ष होते. मनात चलबिचल असायची. त्यातून त्याने चोरीचा इरादा ठरविला. त्यासाठी त्याने १० डिसेंबरची रात्री निवडली. रात्री गुपचूप वसतिगृहात घुसला अन्‌ एक बळी घेऊन अपराधी परतला.

औरंगाबाद - वसतिगृहानजीकच काम करीत असल्याने राहुल शर्माचे तेथून दिसणाऱ्या मुलींच्या खोलीकडे सारखे लक्ष होते. मनात चलबिचल असायची. त्यातून त्याने चोरीचा इरादा ठरविला. त्यासाठी त्याने १० डिसेंबरची रात्री निवडली. रात्री गुपचूप वसतिगृहात घुसला अन्‌ एक बळी घेऊन अपराधी परतला.

घटनेपूर्वी काय झालं?
१० डिसेंबरला सकाळी दहा ते सहा शर्माने काम केले.  रात्री साडेनऊला वसतिगृहात हजेरी झाली.
हजेरीनंतर आकांक्षा खोलीत परतली   साडेनऊदरम्यान वसतिगृहाच्या बाजूच्या नवीन इमारतीच्या छतावर गुपचूप राहुल लपून बसला.  बांधकामासाठी केलेल्या मार्गाने पत्रा सारून तो रात्री बाराच्या सुमारास वसतिगृहात आला.
दोन तीन दरवाजांवर त्याने थाप मारली; पण प्रतिसाद मिळाला नाही. 
आकांक्षाच्या खोलीचा दरवाजा उघडा होता, आयतीच संधी मिळाल्याने तो आत घुसला. 

काय घडलं खोलीत? 
पोलिसांना राहुलने सांगितले, की चोरी हा माझा उद्देश होता. त्यावेळी आकांक्षा खोलीत झोपलेली होती. मी चाचपणी केली, बॅग तपासल्या. काहीच न मिळाल्याने आकांक्षाच्या गळ्यातील साखळी ओढत होतो. इतक्‍यात तिला जाग आली. मी तिचे तोंड दाबले. तिने माझ्याशी झटापट सुरू केली. मला ती ओळखेल म्हणून मी तिचा गळा दाबूनच राहिलो. तिचे केस ओढले, ती खाली पडली व तिला इजा झाली. झटापटीत आरसा खाली आला व टेबलही पडला. मी संतापलो; पण ती मृत झाली नाही असे वाटले. तिच्यावर जबरी करण्याचा प्रयत्नही केला. पण, आकांक्षाकडून झालेला प्रतिकार पाहता मग तिचे पुन्हा हाताने तोंड व गळा दाबला. ती मृत झाली, यानंतर मी खोलीत थांबून साखळी घेऊन पहाटे तीननंतर स्वतःला लपवत वसतिगृहापासून जवळच असलेल्या माझ्या खोलीकडे गेलो.

Web Title: What exactly happened on the aakansha murder case day