औरंगाबाद शहरात कुठे काय घडले वाचा... 

file photo
file photo

झाड तोडणे अंगलट, दोघांवर गुन्हा 

औरंगाबाद : छावणी परिषदेच्या कार्यक्षेत्रातील झाड तोडल्याप्रकरणी दोघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात सात नोव्हेंबरला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याबाबत छावणी परिषदेचे निळकंट इश्‍वरे यांनी तक्रार दिली. त्यानुसार अब्दुल बारी अब्दुल करीम व नासीर अब्दुल करीम अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी भुमीविभागाची परवानगी न घेता वार्ड क्रमांक सहामध्ये बैलांच्या गोठ्याजवळील लिंबाचे झाड तेरा ऑक्‍टोबरला तोडले. असे तक्रारीत नमुद आहे. 

सिडको, शिवाजीनगरमधून दुचाकी लंपास 
 
औरंगाबाद : सिडको एन-पाच, शिवाजीनगर येथून चोरांनी दोन दुचाकी लंपास केल्या. या घटनांप्रकरणी संबंधित ठाण्यात सात नोव्हेंबरला गुन्ह्याची नोंद झाली. 
साहील संजय दाभाडे (रा. शताब्दीनगर, हडको एन-12) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना एक नोव्हेंबरला एमजीएम कॅम्पसमध्ये घडली. साहीलच्या तक्रारीनुसार सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शेख जिलानी अब्दुल गफार (रा. जुनाबाजार) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना धरतीधन सोसायटी शिवाजीनगर भागात चार नोव्हेंबरला घडली. 

भंगाराची नोंद पोलिसांना न देणे पडले महागात 

औरंगाबाद : बंधनकारक असूनही भंगार खरेदी विक्रीच्या नोंदी पोलिसांना न दिल्याने भंगार व्यावसायिकाविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात सात नोव्हेंबरला गुन्ह्याची नोंद झाली. अब्दुल सलीम अब्दुल रऊफ असे भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे जयभारत कॉलनीत न्यु महाराष्ट्र स्क्रॅप सेंटर नावाने व्यवसाय आहे. 

रिक्षात बसताच महिलांनी लांबविले पन्नास हजार रुपये 

औरंगाबाद : रिक्षातून जाणाऱ्या प्रवासी महिलेचे तीन सहप्रवासी महिलांनी पन्नास हजार रुपये लंपास केली. ही घटना सहा नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच ते सव्वासहादरम्यान महावीरचौक ते एसटी कॉलनीदरम्यान घडली.

कल्पना विजयचंद जैन (वय 60, रा. एसटी कॉलनी, सिडको एन-दोन)  मुलांच्या शिक्षणासाठी पैसे आणण्यासाठी त्या सौंदाने (ता. मालेगाव) येथील भावाकडे गेल्या. तेथून पन्नास हजार रुपये घेऊन त्या नाशिक-औरंगाबाद बसने महावीर चौकात उतरल्या. त्यानंतर त्यांनी पर्स तपासली असता, त्यात पैसे होते.

एसटी कॉलनीतील घरी जायचे असल्याने त्यांनी बाबा पेट्रोल पंप येथे रिक्षात बसल्या. त्यावेळी रिक्षात आधीच तीन महिला बसलेल्या होत्या. या महिलांनी प्रवासादरम्यान बसण्यास अडचण होत असल्याचे सांगून जैन यांचे लक्ष विचलीत केले. त्यानंतर पर्समधून पन्नास हजार रुपये लंपास केले. रिक्षातून उतरल्यानंतर घरी जाण्यापुर्वी त्यांनी पर्स तपासली असता पैसे लंपास झाल्याचे त्यांना लक्षात आले. यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

तासभरात चोरांनी फोडली तीन घरे 

औरंगाबाद : दिवाळीत गावी गेलल्या शिवाजीनगर भागातील तीन रहिवाशांच्या घरांना चोरांनी खिंडार पाडून चोवीस हजार सातशे रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटना 27 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान घडल्या.

शिवाजी लक्ष्मण बरडे शिक्षक असून शिवाजीनगर येथे राहतात. ते दिवाळीनंतर गावी गेले होते. त्यानंतर चोरांनी त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून साडेसहा हजारांचा ऐवज लंपास केला. दुसरा प्रकार शिवाजीगनर येथीलच अनील जनार्धन चव्हाण यांच्याकडे घडला. त्यांचे घर फोडून चोराने साडेनऊ हजारांचा ऐवज लांबविला.

तिसरा चोरीचा प्रकार गोपाल बंकटलाल काबरा (रा. शिवाजीनगर) येथे घडला. ते सणानिमित्त ते गावी गेले होते. त्यांच्या घराला कुलुप पाहुन चोरांनी त्यांचे घर फोडून नेपाळ, सिंगापुर देशातील चलनी नोटा, चांदीची नाणे,ख सिक्के असा एकुण आठ हजार सातशे रुपयांचा ऐवज चोरला.

पैशांच्या वादातून तरुणावर चाकुहल्ला 

औरंगाबाद : जुन्या आर्थिक वादातून रिक्षाचालकाला ओळखीतील तिघांकडून मारहाण करुन चाकुने वार करण्यात आला. ही घटना पाच नोव्हेंबरला सिद्धार्थ उद्यानासमोरील पुलाजवळ घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सुनील सुखलाल इंगळे (वय 22, रा. रांजणगाव कमलापुर फाटा) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. सुनीलने दिलेल्या तक्रारीनुसार लक्ष्मीकांत हिरालाल सोने, उर्फ लच्छु, सोनु मधुकर शिंदे, अनीस अशी संशयितांची नावे आहेत.

लाच मागितली अन..गुन्हा दाखल 

औरंगाबाद : वाहतुक नियम न पाळल्यामुळे दंड करण्याऐवजी दुचाकीस्वाराला लाच मागितल्याप्रकरणी वाहतुक पोलिसाविरुद्ध हर्सुल पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. सात) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, धनाजी रामा राठोड (रा. हर्सुल परिसर) असे संशयित वाहतुक कर्मचाऱ्याचे नाव आहे. हर्सुल टी पॉइंट येथून वसीम नजीरोद्दीन शेख (रा. बायजीपुरा) हे दुचाकीने जाताना त्यांना हर्सुल वाहतुक पोलिस चौकीजवळ राठोड यांनी हात दाखवुन थांबविले.

त्यानंतर हेल्मेट नसल्याबाबत विचारणा करुन दुचाकीची चावी काढुन घेतली. ""नातेवाईकाच्या अंत्यविधीला जात आहे, घाईत निघालो दंड भरतो.'' असे वसीम शेख यांनी वाहतुक पोलिसाला सांगितले. मात्र दंडाऐवजी त्यांनी पैशांची मागणी करुन पैसे आणायचे सांगितले व तरुणाकडून चारशे रुपये घेतले. याविरोधात तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार हर्सुल ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com