बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर...? जाणून घ्या!

विकास देशमुख
Thursday, 7 November 2019

आताच्या बाईकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले, तर काय होईल? ती बाईक चालेल? चालली तर तिचे आयुष्य किती असेल? ती एक लिटर डिजलमध्ये किती माइलेज देईल? या सगळ्या प्रश्नांची तज्ज्ञांशी बोलून esakal.com ने घेतलेली खास माहिती...

औरंगाबाद : पेट्रोलच्या तुलनेत  डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे चारचाकी घेताना अनेक जण डिझेलवर चालणाऱ्या चारचाकीला प्राधान्य देतात. मात्र, दुचाकी घेताना हा पर्याय नाही. त्यामुळे पेट्रोलवर चालणारीच बाईक आपल्याला घ्यावी लागते. पण, 80-90 च्या दशकात राजदूत कंपनीची बाईक पेट्रोलच नव्हे, तर केरोसीनवरही (राॅकेल) चालत होती. ग्रामीण भागात केरोसीन सहज उपलब्ध होत असल्याने त्या काळात राजदूतच्या बाइकला मोठी मागणी होती. नंतर संबंधित कंपनीने उत्पादन बंद केले. शिवाय आता पूर्वीप्रमाणे केरोसीनही सहज उपलब्ध होत नाही. पण, आताच्या बाईकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले, तर काय होईल? ती बाईक चालेल? चालली तर तिचे आयुष्य किती असेल? ती एक लिटर डिजलमध्ये किती माइलेज देईल? या सगळ्या प्रश्नांची तज्ज्ञांशी बोलून esakal.com ने घेतलेली खास माहिती...

Image result for bike petrol diesel

काय होईल बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर?

औरंगाबादमधील एका गॅरेजचे मालक जावेद शेख यांना विचारले असताना ते म्हणाले, की जर दुचाकीच्या पाईपमध्ये पूर्वीचेच थोडेफार पेट्रोल असेल, तर बाईक स्टार्ट होईल. पण, पाईपमधील पेट्रोल संपताच  इंजिनला डिझेलचा पुरवठा सुरू होईल. तसे झाल्यास इंजिनचा आवाज वाढेल. बाईकमधून मोठ्या प्रमाणात काळा धूर निघेल. गती धीमी होईल. त्यामुळे दुचाकी चालवण्यासाठी एक्सलरेटरवर जास्त जोर द्यावा लागेल. परिणामी, इंजिनवर अधिक ताण येऊन ते गरम होईल. त्यामुळे दुचाकी बंदही पडू शकेल. शिवाय गास्केटही जळू शकेल.

Image result for motor bike garage servicing india

जर बाईकमध्ये पूर्वीचे पेट्रोल नसेल तर....

तुमच्या बाईकमध्ये जर पूर्वीचे काहीच पेट्रोल नसेल आणि तिच्यात डिझेल टाकले, तर ती सुरूच होणार नाही. पण, चुकूनही असा प्रयोग करू नका. कारण तसे केल्यास तुमच्या बाईकचे मोठे नुकसान होईल. जर चुकून रिकाम्या टॅंकमध्ये डिझेल टाकलेच, तर त्या बाईकचा पूर्ण टॅंक रिकाम करावा लागेल. सोबतच फ्यूएल पाइपलाईन आणि कार्बोरेटरची स्वच्छता करावी लागेल. तरच ती बाईक सुरू होईल.

Image result for petrol engine diesel engine difference

पेट्रोल व डिझेल इंजिनमध्ये हा आहे फरक

  • पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनाचे इंजिनमध्ये स्पार्क प्लग असतो.
  • डिझेलवर चालणाऱ्या वाहनाच्या इंजिनमध्ये फ्यूएल इंजेक्टर असतो.
  • डिझेल इंजिन हाय कम्प्रेशनमुळे खूप जड असते. त्यामुळे वाहनांचा आवाज अधिक होतो.
  • डिझेल इंजिन जास्त गरम होते. त्याची एफिशिएन्सी पेट्रोल इंजिनपेक्षा अधिक असते. त्यामुळे ते माइलेजही अधिक देते.

हेही वाचा - सहा महिन्यांत दोनशे वाहन परवाने निलंबित

जाणून घ्या - मॉर्निंग वॉकचे फायदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happens if you use Diesel instead of Petrol in your Bike?