काय आहे ‘पेन मॅनेजमेंट’ ? 

file photo
file photo

नांदेडः मानवी शरीराच्या कुठल्याही भागास इजा झाल्यास किंवा नियमित कामात अडथळा निर्माण झाल्यास मेंदुला ज्या संवेदना होतात त्यास ‘पेन’ असे म्हंटले जाते.

सध्या अनेक आजारांचे स्वतंत्र डॉक्टर्स गोळ्या-औषध आणि त्या पुढे जाऊन शस्त्रक्रीयेच्या माध्यमातून रूग्णांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, काही वेदना ह्या अशक्य अशा असतात. त्या सर्वच वेदना निवारण शास्त्राद्वारे कमी केल्या जातात, याच ‘पेन मॅनेजमेंट’ची माहिती अाजच्या अनेकांना नसते. पर्यायाने विविध उपाय शाेधताना प्रत्येकाने सुदृढ आराेग्यासाठी ‘पेन मॅनेजमेंट’ जाणुन घ्यावे असे ‘सकाळ’शी संवाद साधताना डॉ. कृष्णा जगदंबे यांनी सांगितले.    

 
एखाद्या व्यक्तीस वयाच्या विशिष्ट टप्यावर पोहचल्यानंतर किंवा खानपानाच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक आजारांची लागण होते. हे खरे असले तरी, सध्या नको त्या वयात नको त्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या आजारापासून काही प्रमाणात आराम मिळु शकताे आणि तात्पुरत्या स्वरूपात का होईना या आजारातून बाहेर पडण्यासाठी ‘वेदना निवारण’ शास्त्र समजुन घेणे महत्वाचे असल्याचे डॉ. कृष्णा जगदंबे यांनी सांगितले.


हिवाळ्यात जुनाट आजार डोकेवर काढतात. यात मान, पाठ, कंबर दुखणे किंवा चाळीशीनंतर ज्या स्रियांची मासीक पाळी बंद झाली त्या स्त्रियांमध्ये हाडाची ठिसुळता दिसून येते. त्यामुळे महिलांचे वजन वाढते आणि पायावर ताण पडतो. यामुळे स्त्रियांच्या पायाचे दुखणे वाढते. असे अनेक स्नायुंचे आजार आहेत. या आजारामुळे त्या रूग्णास जीवंतपणे मरण यातना सोसाव्या लागतात.

शिवाय एखाद्या खेळाडुची मैदानावर खेळताना स्नायुवर अतिताण पडल्याने नस फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रचंड वेदना होतात. कधी कधी तर ह्या वेदना सहन होत नाहीत. त्यामुळे अशा आजारावर डॉक्टर्सकडून शस्त्रक्रीया करणे हा एकमेव उपाय सुचवला जातो. पण अनेकजण गंभीर आजारावर शस्त्रक्रीया करून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. तेंव्हा त्यांना वेदना निवारणातुन मुक्ती मिळविण्यासाठी ‘पेन मॅनेजमेंट’ हा एकमेव उपाय असतो.

जनजागृतीचा अभाव

रूग्णास तात्पुरत्या स्वरूपात विनाशस्त्रक्रीया ह्या वेदना कमी करुन आजार तात्पूरत्या स्वरूपात पुढे ढकला येऊ शकतो. यासाठी रूग्णावर विना शस्त्रक्रिया नेमकी नस शोधुन अगदी इजेंक्शनाद्वारे त्यावर उपचार केला जातो. यालाच वेदनारहित शास्त्र म्हटले जाते. परंतु, या शास्त्राबद्दल प्रगत देशाच्या तुलनेत आपल्याकडे मोठे शहर वगळता म्हणावे त्याप्रमाणे जनजागृती झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com