देशमुखांच्या बालेकिल्ल्यात काय होणार? 

देशमुखांच्या बालेकिल्ल्यात काय होणार? 

लातूर - (कै.) विलासराव देशमुख यांचे गाव म्हणून बाभळगावची ओळख. वर्षानुवर्षे येथे त्यांचीच सत्ता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बाभळगाव गटात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कॉंग्रेससाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे. येथेही त्यांच्यासमोर भाजपचे आव्हान आहे. 

बाभळगाव गटाच्या जुन्या रचनेत बाभळगाव, धनेगाव, सेलू, शिवणी खु., शिरसी, कातपूर, कव्हा, खोपेगाव, चांडेश्वर, पेठ, वासनगाव, खाडगाव, सिकंदरपूर या गावांचा समावेश होता. 

नवीन रचनेनुसार बाभळगाव, शिवणी खु., सेलू, धनेगाव, सिरसी, कातपूर, महाराणा प्रतापनगर, सिकंदरपूर, सारोळा, सोनवती या गावांचा समावेश आहे. 

बाभळगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. कॉंग्रेसच्या वतीने साधना जाधव, भाजपच्या वतीने गौरी देशमुख, शिवसेनेच्या वतीने पार्वती गव्हाणे, तर अपक्ष म्हणून राधाबाई थडकर निवडणूक लढवीत आहेत. बाभळगाव गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. यात कॉंग्रेसच्या सरस्वती पाटील व भाजपच्या वच्छलाबाई जाधव निवडणूक लढत आहेत. येथे सरळ लढत होत आहे. महाराणा प्रतापनगर हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. यात कॉंग्रेसचे आनंद वाघमारे, तर भाजपकडून अमर गायकवाड रिंगणात आहेत. 

बाभळगाव गटातून कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली म्हणजे विजय सहज शक्‍य आहे, असे कार्यकर्ते मानतात. त्यामुळे येथून अनेकांची मागणी होती. आमदार अमित देशमुख यांनी महाराणा प्रतापनगर येथील सुभाष जाधव यांच्या पत्नी साधना यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करून शेवटच्या टप्प्यात त्यांना कामाला लावणे हे महतत्त्वाचे काम पदाधिकाऱ्यांना करावे लागत आहे. उमेदवारापेक्षा श्री. देशमुख यांच्यासाठीच ही निवडणूक महत्त्वाची आहे. 

भाजपचेदेखील या गटाकडे लक्ष आहे. पक्षाने सारोळा येथील गौरी देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या गटात जाहीर सभा घेऊन वातावरण तापवले आहे. इतकेच नव्हे, तर कॉंग्रेसच्या उमेदवार ज्या ठिकाणी राहतो तेथील ग्रामपंचायतीचे काही सदस्य भाजपमध्ये घेऊन कॉंग्रेसला धक्का दिला आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com