गव्हाच्या पेऱ्याला पाणीटंचाईचा फेरा!

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

भादा - आला आला आणि भरपूर झाला म्हणून शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या पावसाच्या पाणी पातळीने चालू हंगामात शेतकऱ्यांना चांगलाच "चकवा' दिला असून भादा व परिसरातील काही विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी तर घड्याळ लावून "तासावर' आल्यासारख्या आहेत. त्यामुळे गव्हाला पाणी पुरेल की नाही, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे.

सलग तीन ते चार वर्षांच्या दुष्काळात होरपळलेला शेतकरी काठोकाठ भरलेल्या विहिरी पाहून सुखावला होता; मात्र आता रब्बी हंगामातील पिकांना गरजेच्या काळातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी कोंडीत सापडला आहे.

रब्बी हंगामातील हरभरा आणि ज्वारी ही पिके कशीबशी कमी पाण्यावर तरतात; मात्र गव्हाला मुबलक प्रमाणात पाणी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गव्हाचा पेरा केलेले शेतकरी पाणीटंचाईमुळे हैराण आहेत. कारण ऐन गरजेच्या काळातच गहू पिकास मुबलक पाणी लागते; मात्र सध्या खालावलेल्या पाणीपातळीमुळे काही ठिकाणी गव्हाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार असून, गव्हाचा एकूण हेक्‍टरी उत्पादन खर्च आणी एकूण हेक्‍टरी उत्पादन याचा ताळमेळ लावताना शेतकऱ्यांची दमछाक होणार आहे. 
 
Web Title: Wheat crops facing water shortage problems