औरंगाबादमध्ये चक्क एटीएमची चोरी

sbi.jpg
sbi.jpg

औरंगाबाद : शहरातील बीड बायपासवर असलेले एसबीआय बँकेचे एटीएम मशीन शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्री चोरट्यांनी लंपास केले. एटीएम मशीन चोरीला जाण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. दुपारीच या एटीएममध्ये पैसे भरले गेले होते. सुरक्षारक्षक नसल्याने पंचवीस लाखांची रक्कमही एटीएम सोबत चोरीला गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

रात्रभर सर्वाधिक रहदारीचा रस्ता असलेल्या बीडबायपासवर व्यापारी संकुल, नागरी वसाहत, मंगलकार्यालये आहेत. दत्त मंदिरासमोर कॅनरा बँकेशेजारी एसबीआय चे एटीएम सेंटर अनेक वर्षांपासून आहे. यात दोन एटीएम मशिन आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारीच हे मशीन रिलोड केले गेले होते. सुरक्षेशिवाय एटीएम सेंटर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी संधी साधली.

घटनास्थळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत मग काढण्याचा प्रयत्न सुरू केले. या चोरीत मोठे चारचाकी जडवाहन वापरल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून घटनेची नोंद पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com