परभणीत व्हॉट्सअॅपग्रुप अॅडमीनला नोटीसा

गणेश पांडे
सोमवार, 16 एप्रिल 2018

परभणी - व्हॉट्सअॅपवर काही पोस्ट करताय....थोडा विचार करा...कारण आपण केलेल्या प्रत्येक पोस्टवर आता पोलिसांची नजर आहे. अक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीबरोबर त्या ग्रुपच्या अडमीनालाही दोषी धरले जाणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप चालविणाऱ्या अॅडमीनला सर्व पोस्टवर बारीक लक्ष देण्याची वेळ आली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील सोशल मिडियावर अक्षेपार्ह पोस्ट करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच परभणी पोलिसांनी 

जिल्ह्यातील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अडमीनला नोटीसा बजावून सक्त ताकिद दिली आहे. याबाबत अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय परदेशी यांनी दिली. व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रक्षोभक विधाने, अशोभनीयय वक्तव्य व जाती - धर्मावर भाष्य केले जाते. त्यामुळे अनेकवेळा जातीय तेढ निर्माण होत असते. या मुळे या ग्रुपवरील चर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता पोलिसांनी काम सुरु केले आहे. परभणी शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय परदेशी यांनी नुकताच एक आदेश काढला आहे. 

Web Title: whtasapp group admin police