पंतप्रधानांचे बंधू म्हणतात, आमच्या नात्यात कशाला दरी निर्माण करता?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

औरंगाबाद : भाषणबाजी करण्यास हे काही राजकीय व्यासपीठ नाही. नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही करू शकता; मात्र आमच्या नात्यात कशाला दरी निर्माण करता, असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावले. तुम्हाला ईश्‍वर सद्‌बुद्धी देवो, अशी मी प्रार्थना करतो, असा टोला लगावताच सत्तारांनी तातडीने व्यासपीठ सोडले. या प्रकाराने वातावरण चांगलेच तापले होते. 

स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनतर्फे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. चार) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रूपांतर आमखास मैदानावर जाहीर सभेत झाले. याप्रसंगी राजकीय फटकेबाजी करण्यात तरबेज असलेले कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांना मंगळवारी मोदी सरकारवर केलेली टीका चांगलीच महागात पडली. प्रल्हाद मोदी यांच्या उपस्थितीतच सत्तारांनी हे धाडस केले. सत्तार म्हणाले, की रेशन दुकानदारांच्या प्रश्‍नांवरील आंदोलनात उतरलेले हेच मोदी खरे आहेत. त्या पंतप्रधान मोदींनी तर अच्छे दिनचे स्वप्न दाखविले होते. त्याचे पुढे काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. या आंदोलनात सहभागी झालेले शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती विलास भुमरे, संतोष माने आदींना पाहून सत्तार म्हणाले, की एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचे आणि आंदोलनेही करायची, हे नाटक बंद करावे. 

यानंतर प्रल्हाद मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरवातच सत्तारांवर टोलेबाजी करीत केली. तुम्हाला आतापर्यंत स्टेज मिळाले नाही का, असा सवाल त्यांनी सत्तारांना केला. नरेंद्र मोदी यांना वाईट म्हणायचे तर म्हणा; मात्र हे व्यासपीठ कोणते आहे, याचे तरी जरा भान ठेवा. येथे राजकीय खिचडी कशाला शिजवता?, असेही ते म्हणाले. त्यानंतर तातडीने आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यासपीठ सोडले. यावेळी डी. एम. पाटील, चंद्रकांत यादव, विश्‍वंभर बसू, मधुकर चव्हाण आदींसह रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: why creates conflict in between me and my brother said by pralhad modi