पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या...

विकास देशमुख
शनिवार, 25 जानेवारी 2020

समशेर बहाद्दूर याचे वडील बाजीराव पेशवा हे हिंदू असतानाही समशेर याने मुस्लीम धर्म का स्वीकारला, याची eSakal.com च्‍या वाचकांसाठी खास माहिती. 

औरंगाबाद - नुकताच पानिपत चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे इतिहासाला उजाळा उजाळा मिळाला. पेशवा बाजीराव आणि मस्‍तानी यांचा पुत्र समशेर बहाद्दर ऊर्फ कृष्णराव याला वर्ष 1761 च्या पानिपत लढाईच वीरमरण आले. मराठा साम्राज्यासाठी तो प्राणपणाला लावून लढला. आयुष्यभर पेशवा आणि मराठा साम्राज्यासाठी एकनिष्ठ असलेला समशेर बहाद्दूर याचे वडील बाजीराव पेशवा हे हिंदू असतानाही समशेर याने मुस्लीम धर्म का स्वीकारला, याची eSakal.com च्‍या वाचकांसाठी खास माहिती. 

कधी झाला समशेर बहाद्दूर?

बाजीरावांच्‍या आयुष्‍यात मस्‍तानीला विशेष स्‍थान होते. बाजीरावांसोबत असलेल्‍या संबंधामुळे मस्‍तानीला आयुष्‍यभर त्रास सहन करावा लागला. एवढेच नाही तर बाजीराव पुण्‍यात असताना तिला ठार मारण्‍याचा प्रयत्‍नही झाला. शिवाय आयुष्‍याच्‍या शेवटी तिला पुण्‍यातील पर्वती बागमध्‍ये कैद करून ठेवले होते. तिला बाजीरावांकडून वर्ष 1734 मध्‍ये एक पुत्र झाला.

तोच पुढे समशेर बहाद्दूर. समशेर बहाद्दूरचाही झाला अतोनात झळ बाजीराव आणि मस्तानीचा पुत्र समशेर बहाद्दूर यालाही चिमाजीअप्पा आणि नानासाहेब पेशव्यांनी मानाचे स्थान दिले नाही. समशेरचासुद्धा आई मस्तानीप्रमाणेच झळ झाला. अनैतिक संबंधातून जन्मलेला, आईवडीलाविना पोर त्यातल्या त्यात मुस्लीम धर्मांचे पालन करणारा, असे अनेक शिक्के समशेरबर बसलेले होते. परंतु, तरीही त्याने पेशवा कुटुंबावरची निष्ठा ढळू दिली नाही. 

हेही वाचा -  इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 
 
वडील हिंदू असताना समशेर बहाद्दूर कसा झाला मुस्लीम? 

मस्तानी आणि बाजीराव यांनी समशेर याचे नाव कृष्णाराव असे ठेवले होते. परंतु त्यावेळी पुण्यातील ब्राह्मणांनी या नामकरणाला मान्यता दिली नाही. त्यामुळे हताश आणि चिडलेल्या बाजीरावांनी त्याचे नाव समशेर बहाद्दूर असे ठेवले. एवढेच नाही तर त्याच्यावर मुस्लीम धर्माचे संस्कार केले. त्यामुळे हिंदू पेशव्याचा हा मुलगा मुस्लीम झाला.  

समशेर कोणत्या प्रातांचा होता सुभेदार?

राजा छत्रसालने बाजीरावला आपल्या राज्याचा काही भाग भेट दिला होता. त्या भागाचे तत्कालीन वार्षिक उत्पन्न 40 लाख रुपये होते. याच भागाचा सुभेदार समशेर बहाद्दूर झाला. या शिवाय बाजीरावांनी त्यांना काल्पी आणि बाँदाची सुबेदारीही दिली होती. पुढे वर्ष 1816 पर्यंत हा भाग त्याच्याच वंशजांच्या ताब्यात होता. नंतर त्यावर इंग्रजांनी ताबा घेतला. त्या बदल्यात समशेर बहाद्दूरच्या वंशजांना इंग्रजांकडून प्रतिवर्षी 4 लाख रुपये दिले जात होते. 

Image may contain: 1 person

आता समशेर बहाद्दूर वंशज आहेत का?

शमशेर बहाद्दूरचा मुलगा अलिबहादूर हासुद्धा शूर होता. शमशेर शहीद झाल्याने पेशवा कुटुंबीयांना अतीव दु:ख झाले. त्यामुळे त्यांनी त्याचा मुलगा अलिबहाद्दूरला श्रीमत्; ही पदवी दिली. श्रीमंत म्हणजे पेशवे व श्रीमत् हे पेशवे कुटुंबातील सदस्य अशा या उपाध्या होत्या. 

नाना फडणवीसांनी पाठवले मराठा सरदाराविरुद्ध लढण्यासाठी

मध्यप्रदेशात मराठा सरदार महादजी शिंदे यांचे वर्चस्व वाढत होते. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नाना फडणवीसांनी अलिबहादूरला पाठवले होते. कारण बाजीरावाच्या रक्ताची भीती मराठा सरदारांना होती. 1857 च्या संग्रामात बांद्याचा नवाब झांशीची राणी व नानासाहेब पेशवा यांच्या बाजूने लढला. तो मस्तानीचा वंशज होता.

वाचा - वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

बंडानंतर बांदा संस्थान खालसा झाले. तेथील नवाबास पेन्शन देऊन इंदूरला आणून बसविण्यात आले. त्यांचे वंशच म्हणजे इंदुरातील अॅडव्होकेट नबाब बहादूर यांचे कुटुंब. ते आजही मस्तानी आणि बाजीरावांचा रास्त अभिमान बाळगून आहे.

संदर्भ - झाशी की रानी (महाश्‍वेता देवी), झाशी की रानी लक्ष्‍मीबाई (डॉ. भवानसिंह राणा), मस्‍तानी (द .ग. गोडसे), राऊ (ना. सं. इनामदार), पानिपत (विश्‍वास पाटील)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Peshwa's Son Converted to Muslim History News