नांदेडमध्ये विधवा महिलेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

कालांतराने तिला तो ठार मारण्याची धमकी देत होता. हा प्रकार २०१३ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत त्याने तिच्यावर सतत धमकी देऊन अत्याचार केला. एवढेच नाही तर तो तिची समाजात बदनामी करू लागला. ही बदनामी तिला सहन झाली नाही. अखेर हा प्रकार तिने आपल्या नातेवाइकांना सांगितला

नांदेड - विधवा महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर तिला ठार मारण्याची धमकी देऊन सतत अत्याचार करणाऱ्या विरुद्ध मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुखेड तालुक्यात राहणाऱ्या एका विधवा महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात किशन गोविंद गोकुलवाड यांनी ओढले. तुझ्या मुलाबाळांचा मी सांभाळ करतो असे म्हणून तिच्यावर अत्याचार केला. कालांतराने तिला तो ठार मारण्याची धमकी देत होता. हा प्रकार २०१३ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत त्याने तिच्यावर सतत धमकी देऊन अत्याचार केला. एवढेच नाही तर तो तिची समाजात बदनामी करू लागला. ही बदनामी तिला सहन झाली नाही. अखेर हा प्रकार तिने आपल्या नातेवाइकांना सांगितला. त्यानंतर तिने मुखेड पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार तिने आपल्या तक्रारीत नमूद केला.

यावरून मुखेड पोलिसांनी किशन गोविंदराव गोकुलवाड (रा. चांडोळा) (ता. मुखेड) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक श्री. सहाणे हे करीत आहेत.

Web Title: widow raped and blackmailed