पती ‘गे’ निघाल्यानंतर पत्नी पोचली ठाण्यात!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

‘गे’ असल्याचे माहीत असूनही त्याने लग्न करण्यापूर्वी ही बाब तरुणीला सांगितली नाही. तिच्या कुटुंबीयांनाही ही बाब माहिती नव्हती. लग्न झाल्यानंतर तो ‘गे’ असल्याची माहिती तिला समजली. त्यानंतर तिने पोलिस ठाणे गाठून फसवणूक व छळाची तक्रार दिली.

औरंगाबाद - ‘गे’ असल्याचे माहीत असूनही त्याने लग्न करण्यापूर्वी ही बाब तरुणीला सांगितली नाही. तिच्या कुटुंबीयांनाही ही बाब माहिती नव्हती. लग्न झाल्यानंतर तो ‘गे’ असल्याची माहिती तिला समजली. त्यानंतर तिने पोलिस ठाणे गाठून फसवणूक व छळाची तक्रार दिली. 

चौतीस वर्षीय तरुणीचे शहरातील एका तरुणाशी लग्न ठरले. बैठक झाली, लग्नापूर्वीचे विधीही पार पडून लग्नही थाटामाटात झाले; परंतु नंतर पती ‘गे’ असल्याची बाब तिला समजली. पतीने लग्नापूर्वी ही बाब तरुणीला किंवा तिच्या पालकांना सांगणे आवश्‍यक होते; परंतु त्यांनी ही बाब सांगितली नाही.

लग्नानंतर तरुणीला शिवीगाळ, शारीरिक व मानसिक त्रास दिला. लग्नात झालेला पाच लाखांचा खर्च तसेच वीस तोळ्याचे सोन्याचे बिस्किटे व दागिने अशी दहा लाखांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार २३ जानेवारी २०१९ ते २८ मार्च २०१९ दरम्यान झाला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife files complaint in Police station after husband Gay leaves