विजेचा शॉक देऊन पत्नीने केला पतीचा खून

crime
crime

उमरी : उमरी तालुक्यातील तळेगाव येथे एका चाळीस वर्षीय इसमाचा त्याची पत्नी आम्रपाली हैबते हिने विजेचा वायरने शाॅक देऊन जीवे मारुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपी पत्नीला उमरी पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक उत्तम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरिक्षक सुदर्शन सूर्य हे अधिक तपास करीत आहे.  मृत्यू  झाल्याची घटना 15 जूनला रात्री 3 वाजता मयत भिमराव यांच्या घरी घडली.

मौजे तळेगाव येथे मयत भिमराव नागोराव हैबते (वय 40 रा. तळेगाव ता. उमरी) याला त्याच्या  स्वतःच्या घरात 15 जून रात्री 3 वाजता त्याची पत्नी आम्रपाली हैबते (वय 25 रा. तळेगाव ता. उमरी) हिने स्वतःच्या पतीला शॉक दिला. मयताच्या पोटावर काळी मीठी जखम झाली होती. मयताचे पँट बदलून दुसरा पँट टाकण्यात आला होता. वारंवार मयताच्या बहिणीने आरोपी पत्नी आम्रपाली हैबते यास भावाच्या मरणाचे कारण विचारपूस केली असता वेगवेगळी उत्तर देत असल्याने फिर्यादी व नातेवाईकांना खात्री झाली की, यातील मयतास त्यांची पत्नी आम्रपाली हैबते हिना विद्युत वायरने शाॅक देऊन जीवे मारले व पुरावा नष्ट केला म्हणून फिर्यादी जयशिला गौतम चव्हाण (वय 35 वर्षे रा. धारजनी ता. भोकर) यांनी दिलेल्या फियादी वरुन आरोपी पत्नी आम्रपाली हैबते हिच्यावर कलम 302, 201 भादवी प्रमाणे उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com