दारूच्या पैशासाठी दोरीने गळा दाबून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

दारूच्या पैशासाठी पत्नीचा दोरीने गळा दाबून पतीनेच खून केल्याची घटना येथील पटेल चौक परिसरात बुधवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पतीच्या विरोधात विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पती पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.

लातूर - दारूच्या पैशासाठी पत्नीचा दोरीने गळा दाबून पतीनेच खून केल्याची घटना येथील पटेल चौक परिसरात बुधवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पतीच्या विरोधात विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पती पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी दिली. 

येथील पटेल चौकात हजारे कुटुंबाचे घर आहे. या कुटुंबातील तुळसा अनंत हजारे (वय ४५) ही महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होती. दारूसाठी पैसे दे म्हणून तिचा पती अनंत हजारे याच्यासोबत तिचे बुधवारी दुपारी भांडण झाले. यात पतीने या महिलेचा दोरीने गळा दाबून खून केला. या घटनेनंतर पती पळून गेला आहे. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Murder by Husband Crime