चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करून पतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

बदनापूर - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २१) रात्री उशिरा बदनापूरमध्ये घडली. भाऊसाहेब कडूबा भोसले (वय ४५) व कुशीवर्ताबाई (वय ४०) असे या पती-पत्नीचे नाव आहे. 

बदनापूर - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून पतीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २१) रात्री उशिरा बदनापूरमध्ये घडली. भाऊसाहेब कडूबा भोसले (वय ४५) व कुशीवर्ताबाई (वय ४०) असे या पती-पत्नीचे नाव आहे. 

भोसले दांपत्य व मुलगा नितीन (वय २३) असे तिघे बदनापुरात स्वतःच्या शेतात बांधलेल्या घरात राहत होते. नितीन शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील कंपनीत नोकरीला आहे. तो रविवारी (ता. २१) सायंकाळी रात्रपाळीच्या कामासाठी निघून गेल्यानंतर ही घटना घडली. दरम्यान, नितीनला त्याची दुधड येथील विवाहित बहीण निकिताने फोन करून वडिलांनी आईचा खून केल्याचे सांगितले. यानंतर नितीनने तातडीने घर गाठले व नातेवाइकांना बोलावून घेतले. आईचीही शोधाशोध सुरू केली. काही वेळाने आईचा मृतदेह घराजवळील विहिरीजवळ आढळला. नितीनने तातडीने बदनापूर पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना माहिती दिली. श्री. खनाळ, फौजदार चैनसिंग गुसिंगे व पोलिस जमादार चरणसिंग बमनावत यांनी घटनास्थळ गाठले.

त्यावेळी कुशीवर्ताबाई यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी भाऊसाहेबचा शोध सुरू केला. त्याचे मोबाईल लोकेशन तीन किलोमीटरवर दाखवित होते. अखेर सोमवारी (ता. २२) पहाटे सहाला भाऊसाहेबचा मृतदेह गणेशबाबा मंदिराजवळील रेल्वे रुळावर आढळला. दरम्यान, चारित्र्याच्या संशयातून वडिलाने आईचा खून केल्याची तक्रार नितीन यांनी बदनापूर पोलिसांत दिली. या प्रकरणी भाऊसाहेब भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मी तुझ्या आईला मारून टाकले’
घटनेची माहिती मिळताच नितीन भोसले यांनी घर गाठले. मात्र, घरी कुणीच न दिसल्याने त्यांनी वडील भाऊसाहेब यांना फोन करून विचारपूस केली. त्यावेळी ‘मी तुझ्या आईला मारून टाकले’ असे भाऊसाहेबने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Murder Husband Suicide