चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

गोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट तालुक्यातील  मारेगाव (वरचे) येथे मंगळवारी (ता. १६ ) पहाटे सुमारे अडीचच्या सुमारास घडली असून, पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

मौजे मोरगाव वरचे येथील रहिवासी चंद्रशेखर वाघमारे ( वय ३८ वर्षे ) याने राहत्या घरी पत्नी सावित्रीबाई वाघमारे ( वय ३५ वर्षे ) हिच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. आरोपी वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीशी सतत भांडत होता. त्यांना दोन मुली व ११ वर्षाचा मुलगा आहे. मृत सावित्रीचा भाऊ चंद्रकांत रामराम लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक  केली. पोलिस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विजयकुमार कांबळे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Wife murderous on character doubt Husband Arrested

टॅग्स