एलआयसी पाॅलीसीत होणार हे बदल

शिवचरण वावळे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नांदेड : विमा नियामक व विकास प्राधिकरणाच्या (आयआरडीए) नव्या मार्गदर्शक तत्त्वाला अनुसरून ३० नोव्हेंबरपासून जवळपास दोन डझन विमा पॉलिसीत नव्याने बदल करण्यात येणार आहेत. बाजारात येऊ घातलेल्या विमा योजनांपूर्वीच भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जुन्या, आकर्षक योजनांत सहभागी होण्यासाठी बुधवारी (ता.सहा) शहरातील ‘एलआयसी'च्या सर्व कार्यालयात विमेदार, विमा प्रतिनिधी आणि विकास अधिकाऱ्यांची गर्दी झाली होती

.
रोख व धनादेशांचा भरणा, तसेच प्रस्ताव अर्ज सातत्याने येत असल्याने सर्वांचा स्वीकार करून त्याची छाननी करण्यासाठी ‘एलआयसी’चे अधिकारी व कर्मचारी कामात बुडून गेल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. या पूर्वी ३१ डिसेंबर २०१४ मध्ये आयुर्विमा महामंडळाच्या वतीने जवळपास २८ पॉलिसी योजना बंद करण्यात आल्या होत्या. त्या जागी एक जानेवारी २०१४ पासून नव्याने पॉलिसींमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले होते. शनिवारी (ता.३०) नोव्हेंबर २०१९ ला देखिल जवळपास २४ पाॅलिसीत नव्याने बदल होणार असून, यात जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष आणि जीवन लाभ सारख्या महत्वाच्या आणि लोकप्रिय पॉलिसीत होणार बदल होणार असल्याचे सूत्राने माहिती दिली.

जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष आणि जीवन लाभ या चार पॉलिसी कोट्यवधी ग्राहकांची आवड असून, नव्या योजना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ‘एलआयसी'च्या या पूर्वीच्या ग्राहकांना जुन्या दराने प्रीमियम हप्ता व बोनस लागु राहणार आहे. त्यामुळे एलआयसीच्या जुन्या पॉलिसी खरेदीसाठी ग्राहकांना ३० नोव्हेंबरपर्यंत सवलत असल्याने जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष आणि जीवन लाभ सारख्या लोकप्रीय विमा पॉलिसी खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे जाणवले.

विमा नियामक व विकास प्राधिकरणाच्या (आयआरडीए) च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वाला अनुसरून ३० नोव्हेंबर पासून धोरणात बदल होणार आहे. जीवन आनंद, जीवन उमंग, जीवन लक्ष, जीवन लाभ सारख्या विमा पॉलिसीचा ग्राहक वर्ग मोठा आहे. त्यामुळे आजही या पॉलिसी खदेरीकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना ३० नोव्हेंबरपर्यंत जुन्या विमा पॉलिसी खरेदी करावी असे एलआयसी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
-जे. जी. लामतुरे (वरिष्ठ मंडळ प्रबंधक, नांदेड विभाग, एलआयसी)   

Attachments area

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This will be a change in LIC's policy