शेतकऱ्यांना लुबडणाऱ्या विमा कंपन्याना सरळ करणार : उद्धव ठाकरे

will take action against insurance companies who make fraud to farmers says Uddhav Thackeray
will take action against insurance companies who make fraud to farmers says Uddhav Thackeray

जालना : राज्यात पिकविमा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपन्यांनी गाावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहे.   शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या विमा कंपन्याना आता सरळ करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

जालना तालुक्यातील साळेगाव येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांना अन्न धान्य वाटपाच्या कार्यक्रमात श्री ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा प्रमुख भास्‍कर अंबेकर, ए.जे. बोराडे, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर सह आदींची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना श्री ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचे मत आणि आर्शिवाद घेऊन मी मोकळा झालेलो नाही. दुष्काळात जनतेला आधार देण्याची जबाबदारी पार पाडण्याचे ओझे माझ्यावर आहे. दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पिक विमा भरूनही नुकसानीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना आपल्या मंत्र्यासह पदाधिकाऱ्यांना देत शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्यांना सरळ करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक करताना राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, संकटाच्या काळात शिवसेना नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेमुळेच शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमातून आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सेनेनेच आग्रह धरल्यामुळे त्याची व्याप्ती व मुदत वाढविण्यात आल्याचे खोतकर म्हणाले. यापुढेही शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही ते म्हणाले. यावेळी जयदत्त क्षिरसागार, मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.

मराठवाड्यातून दुष्काळ हद्दपार करणार -
मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मराठवाड्यातील अकरा धरणे पाईप लाईनने जोडण्याचा निर्णय चांगला असल्याचे सांगत दुष्काळ मुक्त मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी श्री ठाकरे म्हणाले.

संभाजीनगरवर पुन्हा भगवा फडकवणारच -
लोकसभा निवडणुकीत दुर्दैवाने चंदकांत खैरे पडले. हा त्यांचा एकट्याचा पराभव नसून माझाही आहे. मात्र, मी संभाजीनगर सुटू देणार नाही. पुन्हा संभाजीनगरवर भगवा फडकवणार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com