औरंगाबादच्या मद्य उद्योगाने दिला साडेतीन हजार कोटींचा महसूल

प्रकाश बनकर
मंगळवार, 10 एप्रिल 2018

औरंगाबाद - मद्यनिर्मितीतून राज्यसरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. एकट्या औरंगाबाद शहरातून मद्यनिर्मिती (बीअर, व्हिस्की) उद्योगांतून तीन ते चार हजार कोटींचा महसूल मिळतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्य उत्पादन शुल्कच्या महसुलात तब्बल सात टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यंदा ३ हजार ६८५ कोटी ८२ लाख रुपयांचा महसूल मद्यनिर्मितीतून शासनाला मिळाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांनी ‘सकाळ’ला दिली. 

औरंगाबादेतील चिकलठाणा, वाळूज एमआयडीसीत बीअरच्या सहा आणि व्हिस्कीच्या चार अशा एकूण दहा कंपन्या मद्यनिर्मिती करतात. यंदा एक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत तीन हजार ६८५ कोटी ८२ लाख रुपयांचा महसूल यातून मिळाला आहे. गेल्या वर्षी ३ हजार ४३९ कोटी ४३ लाख रुपये महसूल मिळाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २४६ कोटी ३९ लाखांची वाढ आहे. विशेष म्हणजे एक बीअर कंपनी बंद असताना ही वाढ झाली आहे. या कंपन्यांच्या प्रत्येक उत्पादनावर राज्य उत्पादन शुल्क विभाग लक्ष ठेवतो. राज्याचा कर भरल्याशिवाय येथे उत्पादित होणारे कोणतेही उत्पादन विक्रीसाठी बाहेर जात नाही, अशी माहिती श्री.वाळुंजकर यांनी दिली.

औरंगाबादेत मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून राज्यशासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. यंदा या महसुलात सात टक्‍के वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत २४६ कोटी रुपये जास्तीचा महसूल विभागास मिळाला आहे. 
-प्रदीप वाळुंजकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

Web Title: wine business revenue