सामर्थ्य लीगमध्ये टुल टेक ऍकॅडेमिया ठरला विजेता

अतुल पाटील
रविवार, 15 डिसेंबर 2019

सामर्थ्य लीगमध्ये एएसआर संघातील गजानन भानुसे हे मालिकावीर ठरले. सहा सामन्यात 14 गडी बाद करत सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. तर, चार सामन्यात 132च्या स्ट्राईक रेटने 117 धावा करणारे ऍडव्होकेट 11 संघातील कुणाल काळे सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले. तर सर्वोत्कृष्ठ यष्टीरक्षकाचा पुरस्कार सामर्थ्य संघातील अतिश जोगदंड यांनी पटकावला.

औरंगाबाद : एमजीएमच्या क्रिकेट मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या सामन्यात अखेर टुल टेक ऍकॅडेमियाने बाजी मारली. विजेत्या संघात शहरातील महाविद्यालयीन प्राध्यापकांचा समावेश आहे. ज्येष्ठ उद्योजक पद्माकरराव मुळे, मानसिंग पवार यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. "एएसआर इंडस्ट्रीज 11' हा संघ उपविजेता ठरला.


Runner UpCaption

सामर्थ्य लीगमध्ये अंतिम लढत रविवारी (ता. 15) टुल टेक आणि एएसआर मध्ये झाली. टुक टेकने प्रथम फलंदाजी स्विकारली. सलामीवीर सागर आव्हाळे आणि सुमित काळदाते यांनी 28 चेंडूत अनुक्रमे 22 आणि 31 धावा कुटल्या. त्यानंतर अच्युत भोसले यांनी 22 चेंडूत 24 तर, विकास शिंदे यांनी 7 चेंडूत 12 धावा केल्या. संघाने 18.5 षटकात सर्वबाद 103 धावसंख्या उभारली. एएसआरकडून गोलंदाजी करताना अजित मुळे यांनी 4 षटकात 15 धावा देत तीन गडी बाद केले. सर्वाधिक धावा करणाऱ्या काळदातेंना मुळे यांनीच झेलबाद केले. याशिवाय कमलेश चौधरी 2, गजानन भानुसे 2 तर संदीप पाटील, पंकज फालके यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.


Samarthya TeamCaption

हेही वाचा -  Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

टुल टेकने केलेल्या 103 धावांचा पाठलाग करताना एएसआरचा संघ 93 धावांवरच सर्वबाद झाला. आठवा गडी येईपर्यंत टुल टेक साठी एकतर्फी वाटणारी लढत राहुल घोगरेंनी रोमांचक स्थितीत आणून ठेवली. नवव्या स्थानावर आलेल्या राहुल घोगरे यांनी दोन चौकार आणि दोन षटकार खेचत 22 चेंडूत 32 धावा कुटत आशेचा किरण दाखविला मात्र, दुसऱ्या बाजूने पडझड सुरुच राहिल्याने पराभव पत्करावा लागला. सलामीला आलेल्या मंगेश गरड यांनी 9 चेंडूत केलेल्या 14 धावा वगळता एकही खेळाडू दोनअंकी धावसंख्या उभारु शकला नाही. गोलंदाजाकडून विकास शिंदे यांनी चार षटकात 15 धावा देत 3 गडी बाद केले. तर सुहास पाटील, सागर आव्हाळे, योगेश तायडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

मराठा बिल्डर्स ऍण्ड आर्किटेक्‍चर्स, प्राध्यापक, डॉक्‍टर्स, व्यापारी संघ, उद्योजक, शासकीय कर्मचारी, वकील संघ, सामर्थ्यचे मेंबरचे आठ संघ होते. बक्षीस वितरणासाठी प्रा. रामदास गायकवाड, डॉ. प्रविण सुर्यवंशी, श्रीधर नवघरे, अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती.

गजानन भानुसे ठरले मालिकावीर..
सामर्थ्य लीगमध्ये एएसआर संघातील गजानन भानुसे हे मालिकावीर ठरले. सहा सामन्यात 14 गडी बाद करत सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरले. तर, चार सामन्यात 132च्या स्ट्राईक रेटने 117 धावा करणारे ऍडव्होकेट 11 संघातील कुणाल काळे सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले. तर सर्वोत्कृष्ठ यष्टीरक्षकाचा पुरस्कार सामर्थ्य संघातील अतिश जोगदंड यांनी पटकावला.

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wineer of Tool Tech Academia in Samarthya League