विजेता मनातच जिंकलेला असतो सीए भूषण तोष्णीवाल 

The winner is convincingly won by CA Bhushan Toshnawal
The winner is convincingly won by CA Bhushan Toshnawal

औरंगाबाद : "कोणताही विजेता आधी त्याच्या मनात जिंकलेला असतो. त्याचे मन, डोके, हात, पाय तसे कार्यकरत जातात आणि तो यशस्वी होतो.'' असे यशस्वितेचे गमक सीए भूषण तोष्णीवाल यांनी "यिन समर यूथ समिट'च्या पहिल्या सत्राची सुरवात करताना उलगडले. 

जन्मल्याच्या विसाव्या दिवशी दृष्टी गमावलेला मुलगा आई वडिलांची प्रेरणा, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर सीए झाला. अशा भूषण तोष्णीवाल यांच्या अतिशय प्रेरणादायी सत्राने "यिन समर यूथ समिट'ची रविवारी (ता. 10) सकाळी सुरवात झाली. सोबतच बालपणी दोन्ही हात गमावलेल्या, पण मनःशक्तीच्या जोरावर पदवीधर झालेल्या योगेश खंदारे या तरुणाच्या मनोगताने पहिले सत्रच अतिशय प्रेरणादायी झाले. 

भूषण तोष्णीवाल यांनी आपला खडतर प्रवास, त्यादरम्यान झालेले अपघात, आईवडिलांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी केलेले कष्ट साध्यासोप्या शब्दांत तरुणांपुढे मांडले. ते म्हणाले, "कोणताही विजेता आधी त्याच्या मनात जिंकलेला असतो. त्याचे मन, डोके, हात, पाय तसे कार्य करत जातात आणि तो यशस्वी होतो. आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळे मी शिकू शकलो. संगीत शिकलो. दहावी, बारावीत चांगले गुण मिळाले. ठरवून कॉमर्स घेतलं. सीएच्या अभ्यासक्रमाची पुस्तकं ब्रेल लिपीत नसल्याने आईने पुस्तके वाचून दाखवली. ती ऐकून अभ्यास केला. लेखनिकाला समजावण्यासाठी पुष्कळ त्रास होई. पण पहिल्याच प्रयत्नांत सीए झालो.''

पाच वर्षांचा असताना विजेच्या धक्‍क्‍याने दोन्ही हात गमावलेल्या योगेश खंदारे याची प्रेरक कहाणी ऐकून उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले. परभणीजवळच्या एका खेड्यात राहणाऱ्या योगेशने महत्प्रयासाने पदवीपर्यंतचा टप्पा गाठला. तो म्हणतो, "तुम्ही शरीराने अपंग असाल, तरी हरकत नाही. पण माणूस मनाने अपंग नसावा. मनाने खचलेला माणूस काहीच करू शकत नाही. दोन्ही हात गमावल्यानंतर आईने पायात पेन धरून लिहायला शिकवले. मग पायाने कॅरम खेळू लागलो. कॉलेजमध्ये मुले सायकल, स्कूटी चालवताना पाहून मला वाईट वाटायचे. पण मी थेट एक सेकंड हॅण्ड कारच विकत घेतली. सुरवातीला शिकवायला कोणी तयार होईना. ड्रायव्हींग क्‍लासने नकार दिला. मग स्वतःच मैदानावर सराव सुरू केला. पायाने स्टार्टर मारला. पायानेच गियर टाकला. सुरवातील जमेना; पण सातच दिवसांत कार शिकलो आणि कॉलेजला घेऊन जाऊ लागलो. आज मी बीए उत्तीर्ण झालो आहे.'' आपण झोपेत खूप स्वप्ने पाहतो. पण डोळे उघडे ठेवून पाहिलेली स्वप्ने खरी करून दाखवण्यात मजा आहे. आपल्यातील वेगळी कला ओळखून त्यात प्राविण्य मिळवा, असा संदेशही त्याने उपस्थितांना दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com