परभणी गारठली, पारा 7 अंशावर

कैलास चव्हाण
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

परभणी : उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे सुरु झालेली थंडीची लाट राज्यात पसरली आहे. त्यामुळे दोन दिवसापासून परभणी जिल्हा गारठुन गेला असून यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान गुरुवारी (ता.20) नोंदवले गेले. 7.05 अंश एवढ्या तापमानाची नोंद येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागात झाली असून येत्या दोन दिवसात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यंदा जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला थंडी  पडल्यानंतर काही दिवसात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पुन्हा थंडीला सुरुवात झाली. तर डिसेंबरच्या सुरुवातीपासून तापमानात सातत्याने चढ उतार पहायाला मिळाले. मागील अठवड्यापासून उत्तर भारतात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे राज्यात थंडगार वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून  परभणी जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. सोमवारपासून सलग पारा थेट 10 अंशाच्या खाली आहे. गुरुवारी (ता. 20) सकाळी सहा वाजता येथील कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागात 7.05 एवढ्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर दुपारच्या तापमानात देखील घट झाली आहे. दुपारी 27.05 अंश एवढे तापमान होते.

वाढती थंडी रब्बी हंगामासाठी पोषक ठरणारी आहे. सध्या ज्वारी, हरभराजोमात आहे. या थंडीचा या पिकांना मोठा लाभ होणार आहे. ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. पहाटेच्यावेळी आणि रात्री शेकोट्या पेटवुन थंडीपासून बचाव केला जात आहे. शहरात उबदार कपड्यांच्या दुकानावर एवढे दिवस शुकशुकाट होता. मात्र सोमवार पासून पुन्हा गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. एकदाच झालेली गर्दी आणि वाढती थंडी पाहुन विक्रेत्यांनी भाववाढ केली आहे. 

जनजीवन विस्कळीत
थंडीच्या लाटेचा परिणाम सर्व जनजिवनावर झाला होता. सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी कुडकुडत आणि उबदार कपड्यात जाताना दिसुन आले. नेहमी लवकर उघडणारी दुकाने देखील 10 वाजेच्या पुढे सुरु झाली. रस्त्यावरची वर्दळ देखील कमी झाली होती. तापमानाचा पारा आणखी खाली घसरणार असल्याची  माहीती  कृषि विद्यापीठातील  हवामान निरीक्षक ए.आर शेख यांनी दिली.

आतापर्यंतचे निचांकी तापमान
17 जानेवारी 2003 - 2.8 
7 जानेवारी 2011-3.9
15 जानेवारी 2012-5.0
14 डिसेंबर 2013-6.5
18 डिसेंबर 2014-3.6
18 जानेवारी 2015-4.4
9 जानेवारी  2016-9.08
11जानेवारी 2017-4.1

Web Title: winter in parbhani 7 degree temperature