‘ती’च्यावरील अन्यायाला फुटणार वाचा

Rape
Rape

औरंगाबाद - महिला व बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे ‘सायबर रिपोर्टिंग पेट्रोल’ पोर्टल (संकेतस्थळ) सुरू करण्यात आले आहे. यामुळे महिला-मुलींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे सोपे होणार आहे. या संकेतस्थळावर आपल्या परिसरात महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात निनावी राहूनही तक्रार नोंदविता येणार आहे. 

गृहमंत्रालयाने महिला व बालकांवरील अत्याचार रोखता यावे या उद्द्ेशाने ‘निर्भया निधी’चा वापर करीत महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय मिशनअंतर्गत हे पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून आपल्या परिसरात लहान मुलांसदर्भात अश्‍लील छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अत्याचार अशा घटनांची तुम्ही थेट या पोर्टलच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकता. निनावी किंवा आपले नाव सांगून अशा दोन प्रकारे तक्रार करण्याची सोय या संकेतस्थळावर उपलब्‍ध करून देण्यात आली आहे.

असे आहे पोर्टल
cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदविताना तुम्ही तुमचे नाव न सांगता ती नोंदवू शकता किंवा तुम्ही नाव सांगूनही तक्रार नोंदवू शकता. या संकेतस्थळावर गुन्ह्याचा प्रकार, गुन्ह्याची माहिती व संशयिताचे वर्णन, घटना कधी घडली, कोणते राज्य, जिल्हा आणि कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली याची माहिती भरणे गरजेचे आहे. तक्रार नोंदविताना नाव दिल्यास पोलिसांच्या मदतकार्यासाठी आपला संपर्क क्रमांक द्यावा लागेल.

या संकेतस्थळावर तक्रार देऊन आपल्या परिसरातील लैंगिक अत्याचारांना वाचा फोडत पीडितांना न्याय मिळवून देता येईल. संकेतस्थळावर तक्रारीचा तपास कुठपर्यंत आला हेदेखील पाहता येऊ शकते. तसेच, या संकेतस्थळावर चुकीची माहिती भरली तर कायद्याने तो गुन्हा ठरू शकतो.
- तन्मय दीक्षित, सोशल मीडिया महामित्र, महाराष्ट्र शासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com