PHOTOS : घर वाचविण्यासाठी अतिक्रमण हटाव पथकासमोरच महिलेने घेतले पेटवून

आर. के. भराड
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

  • अतिक्रमण काढतानाचा प्रकार 
  • वडगाव कोल्हाटी येथील घटना 
  • पथकासमोरच प्रकार; अधिकाऱ्यांनी काढला पळ 
  • प्रकृती गंभीर 

वाळूज, (जि. औरंगाबाद) - सिडको प्रशासनाच्या वतीने वडगाव (कोल्हाटी) येथे सोमवारी (ता. 25) अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, या मोहिमेला विरोध करीत एका महिलेने अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथकासमोरच स्वतःला पेटवून घेतले. यात महिला 40 टक्के भाजली असून, या प्रकारामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून
पळ काढला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. भारती जयराम चव्हाण (वय 45) असे त्या महिलेचे नाव आहे. 

Image may contain: 1 person
भारती चव्हाण

वडगाव (कोल्हाटी) येथील गट नंबर 4 व 14 मधील गायरान जमीन सिडकोने अधिसूचित केलेली आहे. या जमिनीवर बन्सी चव्हाण, राया चव्हाण, मोहन चव्हाण, सखुबाई माळी, प्रेम चव्हाण, भारती चव्हाण, भानुदास साळवे, बाबूराव वाकेकर हे राहतात. हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त घेत सिडकोचे विकास अधिकारी ठाकूर, सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे, कार्यकारी अभियंता दीपक हिवाळे, उदयराज चौधरी आदींच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास क्रेनच्या मोहीम सुरू झाली. यास अतिक्रणधारकांनी विरोध केला; मात्र तगडा पोलिस बंदोबस्त असल्यामुळे अतिक्रमणधारकांना विरोध चालला नाही.

Image may contain: 4 people, people standing, outdoor and nature
घटनास्थळावर असलेला पोलिस बंदोबस्त

दरम्यान, ही मोहीम सुरू असतानाच दुपारी साडेतीनच्या सुमारास भारती चव्हाण (वय 45) यांनी पथकासमोरच स्वतःला पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात येताच पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने श्रीमती चव्हाण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल
  
स्थानिक झाले संतप्त 

या प्रकारामुळे अतिक्रमणधारक संतप्त झाले होते. अतिक्रमणधारकांसह भारती चव्हाण यांच्या नातेवाइकांने सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या प्रकारामुळे घाबरलेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Image may contain: one or more people, people standing, tree, outdoor and nature
संतप्त झालेले नागरिक.

अतिक्रणधाराकारांनी बांधली घरे 

ही जमीन सिडकोकडे हस्तांतरित केल्यानंतर या जागेवर ताबा असणाऱ्यांनी ही जागा मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व सिडकोकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी अपील दाखल करण्यास विलंब क्षमापनाचा अर्ज नामंजूर करीत या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्याचा सल्ला दिला
होता. सिडकोच्या ताब्यात असलेल्या या सरकारी जागेवर अतिक्रमणधारकांनी घरे बांधलेली आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman Attempted Suicide by Burning At Waluj