उदगीर : महिला उपसरपंचाकडून पाण्यासाठी महिलेस मारहाण

उदगीर : महिला उपसरपंचाकडून पाण्यासाठी महिलेस मारहाण

उदगीर : सोमनाथपूर (ता.उदगीर) येथील महिला उपसरपंचाने सार्वजनिक बोअरवर पाणी भरण्याच्या कारणावरुन हाणामारी करत एका महिलेची घागर फोडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून उपसरपंच महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात दुष्काळामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली असून थेंब-थेंब पाण्यासाठी नागरिक भटकंती करताना दिसून येत आहेत. सोमनाथपूर येथील महिला उपसरपंच संगीता राठोड यानी सार्वजनिक बोअरवर नागरिकांना पाणी भरण्यासाठी मज्जाव करत मारझोड केली. तसेच घागर फोडली, घरात घुसत, घागरी फोडत, विटा व दगडफेक केल्याची फिर्याद शांताबाई राठोड यानी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एखाद्या गावचे उपसरपंच हे नागरिकांसोबत असे वर्तन करत असतील तर नागरिकांनी जायचे कोणाकडे? असा प्रश्न सोमनाथपूर ग्रामस्थ विचारत आहेत. तसेच मोठा अनर्थ होण्याआगोदर प्रशासनाने पाण्याच्या गंभीर बाबींकडे लक्ष घालावे, अशी मागणी सोमनाथपूर ग्रामस्थ करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com