बारा दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला शेततळ्यात, अबंडची घटना.  

बाबासाहेब गोंटे
Sunday, 1 November 2020

  •  
  • रोहीलागड येथील शेततळ्यात आढऴला महिलेचा मृतदेह,  
  • बारा दिवसांपासून घरातून गेली होती निधून. 
  • पाचोड पोलिस ठाण्यात कुटुंबियांनी दिली होती मिसिंगची तक्रार.
  • रोहीलागड शिवारातील घटनास्थळी बघ्यांची गर्दी. 

अंबड (जालना) : अंबड तालूक्यातील रोहिलागड शिवारातील एका शेततऴ्यात महिलेचा म़ृतदेह आढळून आला आहे. ही माहिती रोहीलागड येथील गावकऱ्यांना कळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गावातील लोकांनी अबंड पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिस व गावकऱ्यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या महिलेची ओळख पटली असून बारा दिवसांपासून ती घरातून निघून गेलेली होती. यासंदर्भांत पाचोड पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार देण्यात आली होती.   

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

याबाबत गावकरी व पोलिसांनी सांगीतले की, अबंड तालूक्यातील तालूक्यातील रोहिलागड येथील शेतकरी तथा सेवानिवृत्त लाईनमन नारायणराव टकले यांच्या शेतशिवारातील शेततळ्यात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगलेला दिसून आला. ही वार्ता त्यांनी गावातील लोकांना व अबंड पोलिस ठाण्याला कऴविली. काही वेळातच घटनास्थळावर पोलिस आढऴून आले. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तेव्हा त्या महिलेची ओळख पटली आहे. सदर मृतदेह हा अबंड तालूक्यातील निहालशिंगवाडी येथील ढवलाबाई रामचंद घुसिंगे (वय 50) यांचा असल्याचे समोर आले. घटनास्थळीच मृत महिलेचा मुलगा चरणसिंग घुसिंगे 
यांनी हा मृतदेह आईचा असल्याचे सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिसांनी सांगीतले की, ढवळाबाई घुसिंगे या हरविल्या असल्याची तक्रार पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. बारा दिवसांपासून त्या घरातून बेपत्ता होत्या. तेव्हापासून पाचोड पोलिस व कुटुंबियांकडून शोधाशोध सुरु होती. या घटनेची माहिती मिळताच रोहिलागड, माहेर भायगव, देशगव्हाणसह आदी ठिकाणच्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेनंतर रोहीलागड शिवारात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. अबंड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अबंड पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman body was found in farm pond Ambad taluka news