महिला आयोग अध्यक्षपदी पुन्हा विजया रहाटकर

Vijaya-Rahatkar
Vijaya-Rahatkar
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. औरंगाबादच्या माजी महापौर असलेल्या विजया रहाटकर या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षाही आहेत. "गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे. खूप काही करण्याचा प्रयत्न केला आहे. तीच रेघ पुढे ओढून पुढील तीन वर्षांमध्येही आयोगाचे काम सर्वस्पर्शी, सर्वांगीण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन,' अशी प्रतिक्रिया श्रीमती रहाटकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com