हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा बसमध्ये मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा बसमध्ये मृत्यू

केज : राज्य परिवहन महामंडळाच्या शिर्डी-निलंगा बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेस धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (ता.२४) रोजी केज शहराजवळ प्रवासादरम्यान घडली.

निलंगा आगाराची बस दुपारी चारच्या सुमारास केज शहराजवळ आली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेस हृदयविकाराचा तीव्र झटका आला. महिलेस त्रास होत असल्याचे निदर्शनास येताच बसचे वाहक-चालक बसमधील प्रवाशांनी बस केज बसस्थानकात न नेता केज पोलिस ठाण्यात नेली. तेथून महिलेस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयात त्या महिलेची डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही मृत पावलेली वृद्ध महिला जनाबाई बाबुराव डिगे (राहणार रांजनी ता. कळंब) असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com