गर्भपिशवी आकुंचन न पावल्याने अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

बीड : दहाव्यांदा गर्भवती असल्याने प्रसूतीनंतर गर्भपिशवी आकुंचन पावली नाही. त्यामुळे रक्तस्राव न थांबल्याने मीरा एखंडे यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष आरोग्य समितीच्या पाहणीत समोर आला. 

मुलगा पाहिजे, या आशेपोटी सात मुलींनंतर दहाव्यांदा गर्भवती राहिलेल्या माजलगाव येथील मीरा रामेश्वर एखंडे (वय 38) या महिलेचा शनिवारी (ता. 29) रात्री उशिरा माजलगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर मृत्यू झाला. मीरा एखंडे यांनी जन्म दिलेल्या बाळाचाही मृत्यू झाला. 

सात मुलींनंतर मुलाच्या आशेने गर्भवती राहिलेल्या मीरा एखंडे ही महिला शनिवारी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. मात्र, प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने या महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागावर टीका आणि आरोप होत होते. दरम्यान, घटनेची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. हरदास, डॉ. शहाणे, डॉ. पारखे, डॉ. शेकडे यांच्या समितीने चौकशी केली. दहाव्यांदा गर्भवती असल्याने असा प्रकार घडल्याचा निष्कर्षही या समितीने काढला आहे.

जन्मत: वजन चार किलोचे होते. गर्भ जसा वाढेल तशी गर्भाशयाची पिशवी वाढत असते. पहिल्या तीन प्रसूती होण्याचा कालावधी हा दहा ते बारा तासांचा असतो. आणि चार प्रसूतीनंतरचा कालावधी सहा ते आठ तासांचा असतो. मीरा एखंडे यांना दाखल करून घेताच इंजेक्‍शन दिले गेले; मात्र त्यांची प्रसूती दोन तास लवकर झाली. चार किलोचे बाळ जन्माला आले. बाळाच्या जन्मानंतर गर्भाशयाची पिशवी नैसर्गिक आकुंचित पावते. मीरा यांची पिशवी मात्र आकुंचित न पावता ती सैल पडली आणि रक्तस्रावाच्या धारा सुरू झाल्या. तब्बल तीन तास डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. रक्ताच्या बाटल्या चढवल्या गेल्या. मात्र, रक्तस्राव काही थांबला नाही. यातच मीरा एखंडे यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. दरम्यान, असा प्रकार अपवादात्मक घडतो. गर्भाशयाची पिशवी आकुंचित पावली असती तर त्यांचा मृत्यू झालाच नसता असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

Web Title: woman died due to complications in pregnancy