युवतीचा उष्माघाताने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

बालानगर - बालानगर (ता. पैठण) येथील दीपाली ऋषी गोर्डे (वय 17) हिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 30) रात्री अकराच्या सुमारास घडली. 

बालानगर - बालानगर (ता. पैठण) येथील दीपाली ऋषी गोर्डे (वय 17) हिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 30) रात्री अकराच्या सुमारास घडली. 

याबाबत माहिती अशी, की दीपाली गोर्डे अकरावीत शिक्षण घेत होती. तिची परीक्षा काही दिवसांवर आलेली होती. ती शेतीकामात आई-वडिलांना मदत करीत असे. गुरुवारी ती शेतात कापूस वेचायला गेली. दिवसभर कापूस वेचला. तिने दिवसभरात जेवण केलेच नाही. सायंकाळी घरी आल्यावर तिने भरपूर पाणी पिले. यानंतर थोड्या वेळाने चहा-बिस्कीट घेतले. थोड्या वेळाने तिला चक्कर येऊन घाम आला व उलट्या सुरू झाल्या. काही वेळातच तिचा घरी मृत्यू झाला. तिच्यावर पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

एकही डॉक्‍टर नाही 
जवळपास दहा हजार लोकसंख्येच्या बालानगरात एकही सरकारी; तसेच खासगी डॉक्‍टर राहत नाहीत. कुठलेच प्राथमिक उपचारही न मिळाल्याने दीपालीचा मृत्यू झाल्याचे मच्छिंद्र गोर्डे, बाळासाहेब गोर्डे, बद्री गोर्डे, शिवाजी गोर्डे यांनी सांगितले. 

Web Title: woman died of heat stroke