बीड : शेततळ्यात बुडून विवाहितेचा मत्यू 

दत्ता देशमुख
Thursday, 9 July 2020

उषा संदीप गिरे (वय २९ वर्षे रा. गिरेवस्ती, लिंबागणेश, ता. बीड) असे या महिलेचे नाव आहे. उषा गिरे बुधवारी रात्री पती संदिप गिरे यांना सांगुन घराबाहेर गेली. रात्री उशिरापर्यंत ती परतलीच नाही. इकडे-तिकडे शोध घेतल्यानंतर त्यांच्या परिसरातील शेततळ्यात मृतदेह आढळून आला.

बीड : शेततळ्यात एका महिलेचा मृतदेह आढळला असून सदर महिला बुधवारी (ता.आठ) रात्री या तळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ही घटना गुरुवारी (ता. नऊ) तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आली.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
उषा संदीप गिरे (वय २९ वर्षे रा. गिरेवस्ती, लिंबागणेश, ता. बीड) असे या महिलेचे नाव आहे. उषा गिरे बुधवारी रात्री पती संदिप गिरे यांना सांगुन घराबाहेर गेली. रात्री उशिरापर्यंत ती परतलीच नाही. इकडे-तिकडे शोध घेतल्यानंतर त्यांच्या परिसरातील शेततळ्यात मृतदेह आढळून आला.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

 याबाबत लिंबागणेश पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लिंबागणेश येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. रकटे यांनी उत्तरीय तपासणी केली. नेकनूर ठाण्यात याबाबत नोंद करण्याची प्रक्रीया सुरु आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले आहेत.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे बलात्कार 

बीड : लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्षे बलात्कार करून लग्न झाल्याची बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तेलगाव नाका येथील शेख पाशा शेख हाशम शेख याच्याविरुद्ध पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

शेख पाशा शेख हाशम याने एका मित्राच्या पत्नीला धमकी देऊन बलात्कार केला. त्यानंतर वारंवार त्याने बलात्कार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर या पीडितेला पतीने तलाक दिल्यानंतर शेख पाशा शेख हाशम हा या पीडितेसोबत लग्न लावल्याप्रमाणे राहू लागला. त्याने लग्न झाल्याची बनावट कागदपत्रेही तयार केली. दोन वर्षांत पीडितेला त्याने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नोंद केले आहे. २०१८ पासून त्याने अचानक बोलणे बंद करून, तू माझी पत्नी नाहीस, मी तुला ओळखत नाही असे म्हणून वाद करू लागला.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

अनेक महिने त्याची विनवणी करूनही त्याने माझी पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला. आपल्याशी शारीरिक संबंध ठेवून आर्थिक लूट करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास फौजदार राजेंद्र बनकर करत आहेत. 
 

संपादन : प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman dies after drowning in farm