रेल्वे प्रवासात महिलेला हृदयविकाराचा झटका

railway
railway

औरंगाबाद : विजयवाडा येथून शिर्डीकडे रेल्वेतून प्रवास करताना 60 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला. अचानक घडलेल्या घटनेनंतर प्रवाशाच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

शिर्डी एक्सप्रेसमधून  विजयवाडा येथील 60 वर्षीय महिला वातानुकूलित डब्यातुन शिर्डीकडे जात होत्या. जालना स्टेशन हुन एक्सप्रेस सुटल्यानंतर अचानक त्यांना हृदय विकारचा झटका आला. प्रवाशांनी ही माहिती नांदेड नियंत्रण कक्षला दिली. नियंत्रण कक्षाने औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे यांना माहिती दिली. त्यांनी भारतीय रेल्वे सेना संघटनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांच्या मदतीने औरंगाबाद स्टेशनला शिर्डी एक्सप्रेस येण्यापूर्वीच रेल्वे स्टेशनला रेल्वे सुरक्षा बल एएसआय विजय वाघ, आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल श्री लांडगे सह टीम सज्य ठेवली. रेल्वे येताच महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

सद्यस्थितीत महिलेवर ट्रॉमा केअर यूनिट मध्ये उपचार सुरु आहे. महिलेला वेळीच उपचार मिळाल्याने प्रकृतीत सुधारणा झाली आहे. उपचारासाठी विलंब झाला असता तर महिलेला जीव गमवावा लागला असता, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com