पाचोड येथे माकडाच्या हल्ल्यात महिला जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पाचोड, (जि. औरंगाबाद) : माकडाने घराच्या गच्चीवर कपडे सुकविण्यास गेलेल्या महिलेस चावा घेतल्याने घाबरलेल्या महिलेने गच्चीवरून उडी मारल्याने महिला जखमी झाल्याची घटना पाचोड (ता. पैठण) येथे गुरुवारी (ता. 29) घडली. 

परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई असल्याने शेतातील वानर, माकड मानवी वस्त्यांमध्ये येत आहेत. या प्राण्यांनी अनेकांवर हल्ले करून त्यांना जखमी केले आहे.  पाचोड येथील नाजेराबी अनिस कुरैशी (वय 40) या गुरुवारी दुपारी घराच्या गच्चीवर कपडे सुकवण्यासाठी गेल्या असता लिंबाच्या झाडावर दबा धरून बसलेल्या माकडाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा करीत गच्चीवरून खाली उडी घेतली. यात महिलेच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमी महिलेला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही माकडाने केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. वन विभागाने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman injured in monkey attack, hospitalized