अनैतिक संबंध तोडण्यासाठी महिलेने केला खून, मृतदेह फेकला नदीत

पोलिसांनी मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार करून आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली.
Murder
MurderMurder

कळंब (जि.उस्मानाबाद) : अनैतिक संबंध कायमचे तोडून टाकण्यासाठी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील लता कवडे या महिलेने तालुक्यातील रत्नापुर येथील फुलचंद निकम (वय५७) यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पोलिस तपासात निष्पन्न झाले. खुनाचे गुढ एका दिवसात उकलण्यास कळंबच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लता, पती दत्ता, मुलगा सचिन कवडे यांना (Crime In Osmanabad) अटक केली असून न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील इटकुर येथील पारा रस्त्यावरील वाशीरा नदीत वाहत्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यूदेह कोल्हापुरी (Kalamb) बंधाऱ्याच्या बांधकामात पाण्यात तरंगत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ इटकुर बिटचे पोलीस कर्मचारी बाळासाहेब तांबडे,श्री जाधव,गणेश वाघमोडे याना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. इटकुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

Murder
लेकरु कोणाचं अन् आनंद कोणाला...

पोलिसांनी मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार करून आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली. १३ ऑक्टोबर रोजी मृत फुलचंद निकम यांचा मुलगा गौरव निकम यांनी वडिलांचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून पोलीसात फिर्याद दिली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्याकडे सोपविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी बी रमेश, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दराडे यांनी तपासाची चक्रे फिरवत १४ ऑक्टोबर रोजी अवघ्या एका दिवसात निकम यांच्या खुनाचे गुढ उकलण्यास पोलिसांना यश मिळाले. या प्रकरणात तालुक्यातील कन्हेरवाडी येथील लता कवडे यांचे निकम यांच्या सोबत अनैतिक संबंध होते. संबंध कायमचे तोडण्यासाठी महिलेने निकम यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. मृत्यूदेह पती दत्ता, मुलगा सचिन कवडे यांनी दुचाकीवर टाकून इटकुर येथील पारा रस्त्यावरील वाशीरा नदीत फेकून दिल्याची कबुली त्या महिलेने तपासात पोलिसांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com