पन्नास लाख घेऊन येणाऱ्या महिलेची लातूरमध्ये चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

लातूर - व्यवहारातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा केंद्र शासनाने बंद केल्यानंतर ज्यांच्या घरी असा पैसा आहे, त्यांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे एकमेकांच्या खात्यावर लाखो रुपये जमा करण्याचा प्रकारही घडत आहेत. असाच प्रकार येथे रविवारी (ता.13) उघडकीस आला. एका मुलीने आपल्या वृद्ध आईच्या खात्यात 50 लाख रुपये जमा केले आहेत. खात्यात हे पैसे जमा करण्यापूर्वी तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंदही करण्यात आली आहे. या पैशांची माहिती आता प्राप्तीकर खात्याला दिली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

औशाकडून एका कारमध्ये लाखो रुपये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार औसा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर चार्ली पोलिसांच्या पथकाने कार (एमएच 04, टीवाय 2302) अडवली. त्यात संगीता लातूरकर या 50 लाख रुपये घेऊन लातूरमध्ये येत असल्याचे आढळले. पथकाने तातडीने ही माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर कार व महिलेला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी, श्रीमती लातूरकर यांनी, आपण हा पैसा आई कोंडाबाई चलवाड यांच्या नावाने आयसीआयसीआय बॅंक शाखेतील खात्यात जमा करण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आईच्या नावाची सही असलेली बॅंकेची स्लीप व पॅनकार्डची सत्यप्रत दाखवली. त्यानंतर पोलिसांसोबत त्यांना बॅंकेच्या शाखेत पाठविण्यात आले. तेथे हा पैसा कोंडाबाई चलवाड यांच्या नावाने भरण्यात आला आहे. याची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. या व्यवहाराची माहिती प्राप्तीकर विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने यांनी दिली. कारमध्ये एक हजाराच्या एक हजार 834 व पाचशेच्या सहा हजार 332 नोटा, असे एकूण 50 लाख रुपये आढळले. 

Web Title: Woman in Latur inquiry