जालना : महिलेचा गळा दाबून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

शहरातील यशोदीपनगर येथील पुजा अमोल पाठक (25) या महिलेचा गळा दाबून खून झाल्याची घटना घडली.

जालना : शहरातील यशोदीपनगर येथील पुजा अमोल पाठक (25) या महिलेचा गळा दाबून खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. 12) साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तीन जणांविरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मृत पुजा अमोल पाठक यांच्या आई लताबाई सुखीलाल मेहरा यांनी दिल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पूजा अमोल पाठक हिचा अमोल वसंत पाठक, उज्ज्वल अमोल पाठक व एका महिलेने संगणमत करुण गळा दाबून खून केला.

दरम्यान, तसेच सीसीटीव्ही कैमरा डीव्हीआर घेऊन पळ काढला. या प्रकरणी अमोल वसंत पाठक, उज्ज्वल अमोल पाठक व एका महिले विरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंदम हे अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman murder in jalana

टॅग्स