औरंगाबाद ; हात पाय बांधून डांबले ड्रममध्ये, महिलेचा खून

योगेश पायघन
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : शहरातील असेफिया कॉलनीत 45 वर्षीय महिलेला हात पाय बांधून ड्रममध्ये डांबुन ठेवत खून केल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजता समोर आली. रत्ना पंडित बिऱ्हारे (रा पाणवदोड ह. मु असेफिया कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर या घटनेपासून पती पंडित बिऱ्हारे फरार आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्ना आणि पंडित गेल्या 12 वर्षांपासून असेफिया कॉलनी येथे इर्शाद शेख यांच्या घरी काम करून शेजारच्या घरी किरायाने राहतात.

17 ऑक्टोबर संध्याकाळ पाऊण रत्ना यांचा संपर्क होत, नव्हता त्यामुळे शनिवारी सकाळी इर्शाद शेख यांनी शोधाशोध केला असता त्यांना रत्ना बेशुद्ध अवस्थेत हात पाय बांधून ड्रम मध्ये आढळून आल्यावर त्यांनी नातेवाईकांना व पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी रत्ना ला घाटीत दाखल केले असता साडेआठच्या सुमारास डॉक्टरांनी मयत घोषित केले. उपनिरीक्षक संजय भुहुरे या प्रकरणी तपास करत असून विजय जोगदंड यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी पंडित बिऱ्हारेवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman murdered in a drum, tied with hands and feet