लाचेच्या आरोपावरून महिला अधिकारी निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

औरंगाबाद - वाळू ठेकेदारांची पकडलेली वाहने सोडविण्यासाठी तीन लाखांची लाच घेणाऱ्या अंबड-घनसावंगीच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर-पालवे यांच्या निलंबनाचा आदेश बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी काढला. 

चौधर यांनी महसूल विभागात रुजू झाल्यानंतर विशेष पदावर काम करण्यास लक्ष दिले. महसूल सेवेत दहा वर्षांच्या काळात त्यांनी औरंगाबाद, जालना येथे सर्वाधिक काळ सेवा केली. अंबड-घनसावंगी उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत असताना सविता चौधर-पालवे यांना वाळू ठेकेदारांची पकडलेली वाहने सोडण्यासाठी तीन लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यांच्या घरांवर छापा टाकून कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. जालना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाईचा प्रस्ताव मिळाल्यानंतर विभागीय आयुक्‍तांनी चौधर यांच्या निलंबनाचा आदेश काढला.

Web Title: woman officer suspended