बस चालक-वाहकाची प्रसंगावधानता, महिलेने दिले गोंडस बाळाला जन्म

Mother And Her Daugther Ausa News
Mother And Her Daugther Ausa News

औसा (जि.लातूर) ः किल्लारी-लातुर प्रवासादरम्यान प्रवाशी महिलेचे पोटदुखत असल्या कारणामुळे एसटी चालक-वाहकांनी गाडी सरळ औसा येथील ग्रामीण रूग्णालयात आणली. त्यावेळी तेथे सेवेत हजर असलेल्या अधिपरिचारिका आणि परिचारिकांनी तत्काळ सेवा पुराविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यानच्या काळात महिला प्रसुत होऊन तिने गोंडस मुलीस जन्म दिला.


सोमवारी (ता.27) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या किल्लारी-लातुर हिरकणी बसने (एमएच 20 बीएल 3814 ) सरोजाबाई मारोती गोणे ही महिला प्रवास करीत असताना तिच्या पोटात जोराच्या वेदना सुरू झाल्या. प्रसंगावधान असलेल्या बसचे चालक एस.आर.गोसावी आणि वाहक एस.आर.मोरे यानी बस गाडी सरळ औसा ग्रामीण रूग्णालयात नेली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अधिपरिचारीका बी.एस.किरवे, परिचारिका सरिता उबाळे, आहिल्या बाजुळगे, योगेश्वरी जाधव, मंगल वाघमारे, मावशी गोदावरी कसबे आणि संगीता कसबे यांनी लगबगीने पुढील उपचार केल्याने सरोजाबाई यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. यात आई व बाळ सुखरूप आहेत. त्यांनी केलेल्या विनंतीवरून त्यांना सोमवारी (ता.27) दुपारी चार वाजेच्या सुमारास घरी सोडण्याची परवानगी ग्रामीण रूग्णालयातर्फे देण्यात येत असल्याचे आरोग्य सहायक बी.पी.लोहार यांनी सांगितले.


लातूर येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी रस्त्यावर
लातूर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात सोमवारी (ता.27) विद्यार्थी रस्त्यावर आले. प्रवेशाद्वारतच त्यांनी दिवसभर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. प्राचार्यसह प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना विनंती करूनही ते महाविद्यालयात गेले नाहीत. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंनीच यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली.


येथील कृषी महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून प्रशासन व विद्यार्थ्यात खदखद सुरु आहे. सोमवारी हे विद्यार्थी रस्त्यावर आले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या सुरु केला आहे. "प्राचार्य साहेब एक काम करो खुर्ची छोडो आराम करो', "शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे", "स्टुण्डंच पॉवर, नेशन पॉवर' अशा घोषणा देत या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला आहे. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो, विद्यावेतन दिले जात नाही, वसतीगृहात सुविधा नाहीत, अशा अनेक मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत. सकाळपासून या विद्यार्थ्यांनी ठिय्या सुरु केला आहे. प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे व प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम होते. कुलगुरुंनी यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com