लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर सतत अत्याचार करणाऱ्या दोघांवर चक्क पाच वर्षानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर सतत अत्याचार करणाऱ्या दोघांवर चक्क पाच वर्षानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाबानगर येथे भाड्याने राहणाऱ्या एका २४ वर्षीय युवतीसोबत अगोदर मैत्री जळवून तिच्याशी संपर्क वाढविला. ही मैत्री एवढ्यावरच न थांबता एकमेकांनी लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. यातून पुढे पिडीत युवती आणि लखन बालाजी शिंदे (वय २७) रा. पाटनुर (ता. अर्धापूर) ह. मु. वसंतनगर, नांदेड यांंच्यात (ता. १२ मार्च २०१४ मध्ये) शरिरसंबंध झाले.

लग्नाचे आमिष दाखवून त्याने पिडीतेवर वेळोवेळी बलात्कार केला. यासाठी लखन शिंदे याचा नातेवाईक गणपत बालाजी शिंदे हा त्याला मदत करित होता. हे दोघेजण तिला बदनामी करण्याची धमकी देत होते. पिडीतेने काही दिवस हा या दोघांचा त्रास सहन केला. लग्न करण्यास लखन शिंदे याला तिने मागणी घातली. यावेळी मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे तिला सांगितले. 

यावेळी आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने चक्क पाच वर्षानंतर शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. पिडीत युवतीच्या फिर्यादीवरुन लखन शिंदे व गणपत शिंदे या दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सोनाबाई कदम करित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman raped in Nanded city