लातूरमधील विद्यार्थ्याने बनविले वुमन सेफ्टी डिव्हाईस

Latur News
Latur News

लातूर : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर लातूरातील एका विद्यार्थ्याने ‘वुमन सेफ्टी डिव्हाईस’ तयार केले आहे. विशेष म्हणजे हे डिव्हाईस केसांना लावलेल्या हेअर पिनसारखे, लिपस्टीकच्या नळीसारखे आणि चावीला लावलेल्या किचनसारखे आहे. त्याचा वापर करून महिलांना समोरच्या व्यक्तीला शॉक देऊन त्याच्या तावडीतून पळ काढता येऊ शकतो. असे आगळे-वेगळे डिव्हाईस अवघ्या ५० ते १०० रुपयांत मिळू शकते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) आणि दयानंद कला महाविद्यालय यांच्या वतीने आविष्कार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात लातूरसह परभणी, नांदेड, हिंगोलीमधील वेगवेगळ्या महाविद्यालयातील १८० विद्यार्थ्यांनी आपला वेगवेगळा वैज्ञानिक कलाविष्कार सादर केला आहे. 

यात अनेकांचे लक्ष वेधून घेतले ते दयानंद कदम या विद्यार्थ्याच्या वुमन सेफ्टी डिव्हाईस प्रयोगाने. दयानंद हा कॉक्सिट महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. सध्या द्वितीय वर्षात शिकत आहे.

हैदराबादमध्ये घडलेली अत्याचाराची घटना ऐकून देश हादरला होता. अशा घटना देशात वारंवार घडत आहेत. म्हणून महिला सुरक्षितता आणि महिला सक्षमता ही गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर दयानंद या विद्यार्थ्याने वुमन सेफ्टी डिव्हाईस आकाराला आणले आहे. 

तुमच्याकडे हे डिव्हाईस आहे का?

याबाबत माहिती देताना तो म्हणाला, बाजारात सध्या वेगवेगळे वुमन सेफ्टी डिव्हाईस आहेत. पण महिलांना ‘तुमच्याकडे हे डिव्हाईस आहे का’, हा प्रश्न विचारला तर त्या नाही हेच उत्तर देतील. कारण हे बाजारातील डिव्हाईस सहज उपलब्ध होत नाहीत. झालेच तर खूप महागडे आहेत. त्यामुळे मी अतिशय स्वस्तातील आणि कुठेही लपवून ठेवता येईल, असा हा वुमन सेफ्टी डिव्हाईस तयार केला आहे. त्यात २५० ते ३५० वोल्टेज सेव्ह करता येते.

याशिवाय, अंधश्रद्धा आणि विज्ञान, पर्यावरण, वायु प्रदुषण, सोलार पॅनेलचा वापर करून डेटा ट्रान्स्फर करणे, गॅस गळती डिटेक्टर... अशा नानाविध विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले. त्यांचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना करून दाखवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com