esakal | सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, सहा जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

crime.png
  • जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पावसे पांगरी येथील हद्द्रावक घटना. 
  • माहेरकडील नातेवाईकांनी अंबड शहरात केले अंत्यसंस्कार. 

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, सहा जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील पावसेपांगरी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडीलांनी सासरच्या सहा जणांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पती नितीन पावसे, सासरा मदन पावसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उषा नितीन पावसे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उषा हीचा अंबड तालुक्यातील पावसेपांगरी येथील नितीन पावसे यांच्याशी (ता. ८ डिसेंबर २०१९) रोजी विवाह झाला होता. परंतु तिला सासरच्या मंडळीकडून नेहमी त्रास मिळत होता. माहेरावून पैसे आण असा सतत तगादा लावला जात होता. त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. असे उषाचे वडील संभाजी आसाराम पठाडे (थेरगाव ता.पैठण) यांनी तशी तक्रार अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.१५) दिली. नितीन मदनपावसे, मदन पावसे, संभाजी पावसे व तीन महिला यांनी संगनमत करुन माझ्या मुलीस आत्महत्यास प्रवृत्त केले असे तक्रारीत नोंद करण्यात आली.  

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिलेल्या लेखी फिर्यादीत म्हटले आहे की, सासरच्या मंडळींनी मुलीचे लग्न झाल्यापासून सतत छळ केला आहे. दोन लाख रुपये कॉम्प्युटरचे दुकान टाकण्यासाठी माहेराहुन आण. नाहीतर जीव दे असे सांगून तिचा कायम शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. सलग चवदा महिन्यापासून हा त्रास सुरु होता. असेही तक्रारीत नोंद करण्यात आली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती नितीन पावसे, सासरा मदन पावसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विहिरीत उडी मारुन केली आत्महत्या 
उषा नितीन पावसे हिने पावसेपांगरी शिवारातील विहिरीतच उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह मंगळवारी सकाळी विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. त्यानंतर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात शववविच्छेदन करण्यात आले. अशी माहिती पोलिस उपनिरिक्षक शैलेश शेजुळ यांनी दिली.

माहेरच्या माणसांनी केले अंत्यसंस्कार 
पावसेपांगरी येथील आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मतय उषा नितीन पावसे हिच्यावर सासरी पावसेपांगरी येथे अंत्यसंस्कार न करता थेरगाव (ता.पैठण) येथील माहेरच्या माणसांनी, नातेवाईक अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालया लगत असलेल्या स्मशानभुमीत सांयकाळी शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार केले. 

(संपादन-प्रताप अवचार)