डोक्‍यात गोळी झाडून महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

नांदेड - वडिलांच्या नावे असलेली शैक्षणिक संस्था आपल्या नावाने करावी, या मागणीसाठी गेल्या सात वर्षांपासून पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका ४१ वर्षीय विवाहित महिलेने पतीच्या पिस्तुलातून डोक्‍यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ३०) रात्री घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी रविवारी (ता. एक) पतीला अटक केली आहे.

वडिलांच्या नावे असलेली शैक्षणिक संस्था आपल्या नावे करावी, या मागणीसाठी नांदेड शहरातील शारदानगर भागात राहणाऱ्या सुचिता केशव घोणसे-पाटील (वय ४१) या महिलेचा पती केशव घोणसे पाटील (वय ४५) हा सात वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करीत होता; तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाणही करीत होता. या त्रासाला कंटाळून सुचिता यांनी शनिवारी रात्री पिस्तुलातून डोक्‍यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. 

आत्महत्येपूर्वी सुचिता यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून मारहाण केलेले व्रणही रेकार्ड केले. यात पंधरा दिवसांपासून होत असलेल्या मारहाणीच्या खुणा दाखविल्या आहेत. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने विमानतळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी पती केशव घोणसे-पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार जावेद शेख करीत आहेत.

Web Title: The woman suicide by shooting herself in the head