रुजू नसलेल्या शिक्षिकेचा पगारच केला हायजॅक!

Crime
Crime

औरंगाबाद - नोकरीसाठी महिलेने अर्ज केला. नोकरी तर दिली नाहीच; पण त्याच महिलेची कागदपत्रे संस्थेने ठेवून घेत ती शाळेतच रुजू असल्याचे भासवले. यानंतर तिच्या नावाने बॅंकेत बनावट खाते उघडून शासनाकडून प्राप्त तब्बल बारा लाख रुपये संशयितांनी हडपले. यात एका उर्दू शाळेच्या अध्यक्षासह सात जणांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. तीन) फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सय्यद नजमा तरन्नुम सय्यद खलील अहेमद (रा. मोमीनपुरा, मूळ गेवराई) यांनी एम.एस्सी., बी.एड.पर्यंत शिक्षण घेतले असून, २००६ ला त्यांनी कैसर कॉलनीतील अलमुबीन शिक्षण संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या अलअजगरी उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक पदासाठी सय्यद नजमा यांनी अर्ज केला. त्यांनी मुलाखत दिली. त्या वेळी त्यांची निवड संस्थेने केली नाही; मात्र त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्‍स संस्थेने ठेवून घेतल्या. दरम्यान, सय्यद नजमा या इतर शैक्षणिक संस्थेत रुजू झाल्या होत्या; परंतु पहिल्यांदा दिलेल्या अलमुबीन संस्थेच्या अलअजगरी शाळेकडून त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर झाला. त्यांच्या दहावी, बारावी व बी.एड.च्या शैक्षणिक कागदपत्रांवर दुसऱ्याच महिलेचा फोटो वापरून अलअजगरी उर्दू हायस्कूलने शिक्षण खात्याची मान्यता मिळविली. त्या कागदपत्रांद्वारे सिडकोतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत बनावट खाते उघडले. सय्यद नजमा या शाळेतच सहशिक्षिका असल्याचे भासवून शासनाकडून बिले व पगार असे बारा लाख रुपये मिळवले. ही बाब समजताच सय्यद नजमा यांनी या प्रकरणात तक्रार दिली.

हे आहेत संशयित 
शाळेच्या अध्यक्ष अजगरी सय्यद, नूरजहा वलीओद्दीन, शेख मुबीन शेख शोएब, अख्तर खान हुसेन खान, शेख मोहसीन शेख शोएब, शेख नाजीमोद्दीन निहालोद्दीन व इम्रान खान फारुख खान.

दुसऱ्यांदा बनवाबनवी..
महिला रुजू असल्याचे भासवून पगार व इतर बिलांसाठी शिक्षण खात्याची मान्यता मिळविली. त्यानंतर शासनाकडून दर महिन्याला प्राप्त एकूण बारा लाखांची पगार मिळविली. सय्यद नजमा यांच्याबाबत हा प्रकार घडला; परंतु याच संस्थेकडून यापूर्वी शहरातील एका महिलेची कागदपत्रे मिळवून शासनाचा पगार हडपला गेला, अशी माहिती निरीक्षक साईनाथ गिते यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com